अशोक गायकवाड
नवी मुंबई :उच्च न्यायालयाचे वेळोवेळी आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत १) श्री. उदय झिटे, एल. एल. -१/बी-४६/४, से. १०, नेरूळ, नवी मुंबई, 2) श्री. नामदेव मसल, एल. एल. -1बी-४६/५, से. १०, नेरूळ, नवी मुंबई, ३) श्री.विकास केसरवाणी, एल. एल.१बी-४२/१२, से.१०, नेरूळ, नवी मुंबई यांचे सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता अंदाजे ३.७५ मी. X ७.७० मी मोजमापाचे जी +४ आर. सी. सी. बांधकाम अनधिकृतरित्या करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अनधिकृत बांधकामधारकाला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नेरुळ विभाग कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५४ अन्वये दि.१० डिसेंबर २०२४ रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. तथापी नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही.सदर कारवाई सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी जयंत जावडेकर व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, १० मजूर, १ गॅस कटर, ४ ब्रेकर च्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक यांच्या मार्फत करण्यात आली. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *