मिरा -भाईंदर / अरविंद जोशी
भाईंदर पश्चिमेकडील एसटी स्थानकाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. भाईंदर पश्चिमकडील जागेचा परिवहन खाते आणि मिरा-भाईंदर महापालिका दोघे मिळून विकास करतील असे त्यांनी सांगितलं. 136 कोटी खर्च करून तेथे अध्ययावत दोन मजली डेपो बनविण्यात येईल, तसेच तेथे मच्छी मार्केट, वाहनतळ सुद्धा बनवण्यात येईल असं पुढे बोलताना त्यांनी सांगितलं.
त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अध्ययावत डेपो उभा राहणार असल्याचे ते म्हणाले. एसटी कामगारांच्या समस्या सोडवून प्रवाशांचा प्रवास सुखाचा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक महापालिका क्षेत्रात RTO केंद्र करणार असल्याचे सांगून उत्तन येथे पूर्ण डिजिटल RTO केंद्र अडीच एकर जागेत उभं राहणार असल्याचे ते म्हणाले.
00000
