कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा परिसरातील दीप ज्योती बिल्डिंग लगतच्या गटाराची दुरावस्था झाल्याने गटारातील सांडपाणी इतस्ततः पसरत असल्याने संभाव्य रोगराई पसरल्यास आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक २९ ठाणकर पाडा येथील गणेश कृपा चाळ नंबर ६.७.९ व १० सदर चाळींमध्ये गटातील सांडपाणी साचलेले दिसून येत आहे. या चाळींकरिता सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी असलेली मेन गटार ही दीप ज्योती बिल्डिंग लगत असून तिची अत्यंत दुर्दशा होऊन पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा पुढे न जाता पुन्हा मागे येत असून त्यातील सर्व दूषित पाणी संपूर्ण चाळीत जमा होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. व त्याचबरोबर सदर परिसरात डासांची उत्पत्ती वाढलेली दिसून येत आहे.
या सर्व बाबींचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आजाराला बळी पडण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी नवीन गटार बांधून द्यावीत. अशा आशायाचे पत्र कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डाँ.इंंदुराणी जाखड यांना मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी निवेदन देत गटार बांधण्याची मागणी केली आहे.
00000
