अशोक गायकवाड
रायगड : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क रायगड-अलिबाग विभागामार्फत उपाययोजनाबाबत रायगड जिल्हयात एकूण ५ कार्यकारी निरीक्षक पथके असून २ भरारी निरीक्षक पथके कार्यरत असून त्यांना रायगड जिल्ह्यातील मद्यविक्री आस्थापनामध्ये परराज्यातील मद्य तसेच बनावट मद्य विक्री होणार नाही याबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या असल्याने त्यांच्याकडून परराज्यातील मद्यविक्री होणार नाही याबाबत योग्य खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले यांनी दिली आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना अवैध मद्य विक्री व हातभट्टी विकीवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात परराज्यातून येणाऱ्या मद्यावर कारवाई करण्याकरीता प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे विभागाशी समन्वय साधून संशयित आढळून येणाऱ्या व्यक्तीच्या सामानाची तपासणी तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येवून परराज्यातून येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नववर्षानिमित्त या जिल्हयात मोठया प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी एकदिवशीय परवाना न घेता विनापरवाना मद्य वितरण होत असल्यास संबंधीतावर कठेार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हयातील रिसार्ट, हॉटेल, कॉटेज, फार्महाऊस या विभागाची तात्पुरती कल्ब अनुज्ञप्ती प्राप्त करुनच कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.या विभागाची विधीग्राह्य अनुज्ञप्ती धारण न करता अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यावर कठोर कारवाई करावी तसेच अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, ढाब्याचे मालक व जागामालक यांचेवर प्रामुख्याने गुन्हा नोंद करण्यांबाबत सूचना या विभागातील अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.रायगड जिल्हयामध्ये दिनांक ०१ एप्रिल, २०२४ ते दि.२६ डिसेंबर,२०२४ या कालावधीत एकूण १ हजार ७५५ गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण 1 हजार ६४० आरोपींना अटक करण्यात आले आहे. या कारवायांमध्ये ७८ वाहने जप्त करण्यात आली असून एकूण रुपये ५,६०,५९,९८७/- इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत व्हॉटस ॲप क्र. ८४२२००११३३ व टोल फ्री क्र.१८००२३३९९९९ वर संपर्क साधनेबाबत जिल्ह्यात अनेक ठिकाणी फलक लावण्यात येवून सदर क्रमांकावर येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ज्या हॉटेल आस्थापनामध्ये तसेच बॅक्वेट हॉ,सोसायटी क्लब हाऊस,मैदाने या ठिकाणी आपण जर नववर्षाच्या अनुषंगाने पार्टीचे आयोजन करणार असाल तर सदर ठिकाणी या विभागामार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या एकदिवसीय अनुज्ञप्तीची परवानगी घेण्यात यावी .विना परवानगा पार्टीचे आयोजन केले असल्याचे आढळून आल्यास आयोजक/जागामालक यांच्यावर नियमातील तरतुदीनुसार रितसर कारवाई करण्यात येईल. तसेच ग्राहकांनी परवानाधारक अनुज्ञप्तीमधूनच मद्य खरेदी करण्याची दक्षता घेण्यात यावी. विशेष कार्यक्रमासाठी परवानगी महाराष्ट्र शासनाच्या https//aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने वितरीत करण्यात येत आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *