ठाणे : दिनांक १० डिसेंबर २०२४रोजी परभणी येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती ही कृत्य जाणीवपूर्वक करण्यात आले यामागे फॅसिस्ट मूलतत्त्ववादाचे कार्य स्थान आहे हे कृत्य ज्याने केले आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे.
तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत जे वक्तव्य केले त्या संदर्भात निर्देश प्रकट करता प्राकृतिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आले व परभणी येथील आंबेडकरवादी नेते विजय वाकोडे यांच्यावर परभणीतील पोलीस अत्याचाराच्या घटनेचा त्रिव परिणाम होऊन त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन आज प्रागातिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने ठाण्यामधील शासकीय विश्रामगृहाबाहेर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले
०००००
