ठाणे :स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धा २०२५ (वर्ष १२ वे) साठी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील व्यंगचित्र पाठवण्याचे आवाहन.
शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा,आयोजित केली आहे. स्पर्धेचं हे १२वे वर्ष असून, या व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी १)बालव्यंगचित्रकार (वय वर्ष १५ खालील),२)दिव्यांग स्पर्धकांसाठी विशेष गट३)हौशी व्यंगचित्रकार – खुला गट (वय वर्ष १६ वरील)४) स्पर्धेतील उत्कृष्ट सहभागासाठी पहिल्या तीन शाळांसाठी विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, अे ३ साईझ ( ४२ X ३० सेंमी ) पेपर मध्ये, तसेच व्यंगचित्राच्या मागे आपले संपूर्ण नाव, आपली जन्म तारीख/वय , स्पर्धक गट, मोबाईल नंबर, आपला पूर्ण पत्ता व बालव्यंगचित्रकारांनी आपल्या शाळेचं नाव लिहून, धर्मवीर आनंद दिघे चौक , मंगला हिंदी शाळेसमोर, कोपरी, ठाणे पूर्व ४००६०३ येथे दिनांक १६ जानेवारी २०२५ ते दि. २० जानेवारी २०२५ च्या दरम्यान सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पोहचवावीत. परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत आयोजित केले जाणार आहे आणि गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते सायंकाळी ७.०० वाजता ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे आयोजित करण्यात येईल. संपर्क: ९२२४१९९९७९/९७६८६८८२९७/९८६९४१३९११/९८३३१५८८००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *