बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती (रजि.) ही संघटना राबवित असलेल्या शालेय विद्यार्थी दत्तक योजनेतील बालमोहन विद्यामंदिर शाळेतील दोन विद्यार्थीनींना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.संदिपजी चव्हाण साहेब व संघाचे उपाध्यक्ष मा.राजेंद्रजी हुंजे साहेब यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दत्तक घेऊन आपले सामाजिक दायित्व जपले. या दोन विद्यार्थीनींच्या वार्षिक शालेय शुल्काचे धनादेश बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांना सुपुर्द करताना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.संदिपजी चव्हाण हे छायाचित्रात दिसत आहेत.
