आमदार महेंद्र दळवी व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत
डॉ. नितीन अंबाडेकर व डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांचे केले कौतुक
अशोक गायकवाड
रायगड : आरोग्य विभागाचे संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, नर्सिंग विभागाचे उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधाबाबत माहिती घेतली आणि या उपक्रमाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. तसेच या शिबीराकरिता सेंट्रल टीबी डिव्हिजनल टीम यांनी भेट दिली.आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची २८ डिसेंबरला सांगता कार्यक्रम संपन्न झाला.
या शिबिरामध्ये जिल्ह्यातील १७४ ज्येष्ठ महिला तर २९० पुरुष असे एकूण ४६४ नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारे उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तसेच हृदयरोग-गरजेनुसार 2D ECHO, X -ray, USG, ECG (stemi) याबाबत ३०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे २९७ रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून डोळ्यांचे आजार व मोतिबिंदू चेकअप करण्यात आले. शिबिरांतर्गत १८६ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून ३७ रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरातील ज्येष्ठ महिलांचे आजार, स्तन कर्करोग व गर्भाक्षयमुख कर्करोगबाबत तपासणी केली गेली. तर ८४ नागरिकांची नाक, कान, घसा बाबत तपासणी व शस्त्रक्रिया करून गरजेनुसार ३० श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच १७८ रुग्णांना ऑर्थोपेडिक चेकअप, एक्स-रे, फिजिओथेरपि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दंत विभागांतर्गत ५१ नागरिकांची मुख आरोग्य तपासणी करून गरजू लाभार्थ्यांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. सर्जरी विभागांतर्गत ३९ नागरिकांची हर्निया, हायड्रोसिल बाबत तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तर मानसिक विभागामध्ये ५७ नागरिकांची मानसिक आजार बाबत तपासणी करून उपचार देण्यात आले. तसेच आयुष विभागांतर्गत ६३ नागरिकांची तपासणी पंचकर्म, आयुर्वेद उपचार देत समुपदेशन करण्यात आले. एकूण २७८ नागरिकाचे रक्त तपासणी करण्यात आली असून, ४५ नागरिकांना आभाकार्ड व आयुष्मान भारत कार्डचे मोफत वितरण करण्यात आले. सदरच्या आरोग्य सेवा शिबिरापुरत्या मर्यादित न राहता जिल्हा रुग्णालयामार्फत यापुढे सुद्धा नियमिय देण्यात येणार आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी तीन दिवसीय शिबीरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे सांगत हे शिबीर यशस्वी झाल्याचे सांगितले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शीतल जोशी-घुगे, डॉ.निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिसेविका गायत्री म्हात्रे, सहा.अधिसेविका भोपी यांच्या सहित सर्व विभागातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कर्मचारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी कर्मचारी आणि नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षकांसहीत विद्यार्थी-विद्यार्थींनीनी सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.