कल्याण : मुंबईत १९३५ साली स्थापन झालेल्या आगरी समाज संघ यांच्या विद्यमाने समाज मोहोत्सव साजरा करण्यात आला. त्या समयी समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्यकरणाऱ्या अनेक बांधवांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये भालचंद्र पाटील यांना आगरी समाज भूषण प्रदान करण्यात आला.
ठाणे जवळील खारीगांवचे सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील हे आपल्या समाज कार्यासाठी सुपरिचित आहेत. आगरी कोळी विकास मंच ठाणे, भूमिपुत्र धर्माभिमानी सेवा संस्था, जागृती मित्र मंडळ ठाणे, खारीगाव भूमिपुत्र शेतकरी संघटना आदी संस्था-संघटनांच्या माध्यमातून भालचंद्र पाटील हे समाजाबरोबर जोडलेले आहेत. 1987 साली त्यांनी जागृती मित्र मंडळ स्थापन करून तरूणांना समाजकार्याची दिशा दिली. नवी मुंबई विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागावे म्हणून ते नामकरण लढ्यात सहभागी झाले.
भालचंद्र पाटील हे खारीगाव येथिल श्री घोलाई देवी देवस्थानचे विश्वस्त आहेत. देवस्थानाच्या माध्यमातुन सुद्धा नियनित सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आगरी समाज संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे, सरचिटणीस सुभाष ठाकूर, कोषाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष डॉ.साजन पाटील, संकेत पाटील आणि संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा यशस्वीपणे पार पाडला. भालचंद्र पाटील यांना ‘आगरी समाज भूषण’ हा बहुमान मिळाल्यामुळे येथिल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
