मृत सरपंच देशमुख, परभणीतील सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय द्या
मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी व परभणी येथील दलित समाज बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी दोन्ही बांधवाच्या कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी मुंबई येथे रविवारी करण्यात आली. सकल मराठा समाजाने या मागणीसाठी चेंबूर नाका येथील एका हॉटेलसमोर आंदोलन केले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शनिवारी बीडला मोर्चा तर तत्पूर्वी; मुंबईतील लालबागला सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले होते. देशमुख हत्या प्रकरण व परभणी येथे झालेल्या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. यासाठी चेंबूर परिसरात मराठा समाज बांधवांनी सकल मराठा समाजाच्या झेंड्याखाली एकत्र येत आंदोलन केले. यावेळी देशमुख हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी यांना फाशी व्हावी व मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारने घ्यावा आणि या मृताच्या कुटूंबाला न्याय द्यावा, अशी मागणी आंदेालनकर्ते यांनी केली. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या त्यांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या.
000