कल्याण : शंभुदुर्ग संघटनेच्या वतीने दरवर्षी नवीन वर्षाचे निमित्त साधून दोन दिवसीय गडकिल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येते.  दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा संघटनेच्या वतीने शहापूर तालुक्यातील आजोबा गडावर स्वछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यभरातील शेकडो शिवभक्तांनी या मोहिमेत उत्स्पूर्त सहभाग नोंदविला असुन, या मोहिमेत स्वच्छता व संवर्धन कार्यासोबत हिंदू धर्मरक्षणाच्या अनेक मुद्यांवर संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली.
आजोबा गड हा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या भूमीत रामायण रचीते महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी असून सितामाई पाळणा, लव कुश जन्मस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या हिंदूंच्या भूमीत मोहिमेत महाराष्ट्र सरकार व भारत सरकार यांना हिंदू धर्मासंदर्भात असलेल्या कायद्यांत बदल करण्याची सुचना वजा मागणी गडावरून फलक झळकावत व विडिओच्या माध्यमातून करण्यात आली.
सनातन बोर्ड तयार करणे, लवजिहाद कायदा कडक करणे, धर्मांतर कायदा कठोर करणे, हिंदू मंदिर शासन मुक्त करणे, गड किल्ले संवर्धन महामंडळ तयार करणे आशा अनेक कायद्यांत सुधारणा करण्याचे निवेदन लवकरच सरकार कडे देण्यात येईल अशी माहिती शंभुदुर्ग संघटना प्रमुख आदेश चौधरी यांनी दिली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *