शहापूर मराठा समाज मंडळाची मागणी
शहापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. हत्येचा तपास जलद गतीने व्हावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने शहापूर तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला आहे.बिड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. हत्या कटाच्या मुख्य सूत्रधारावर एका बड्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असून तपास प्रक्रियेतही हस्तक्षेप असल्याने त्यास अटक होत नसल्याने मराठा समाजाच्या सरकारप्रती भावना तीव्र आहेत.
या गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा,तसेच योग्य तपास होणेसाठी एस.आय.टी. स्थापन करावी किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
तपास कामात सातत्याने दिरंगाई होत असेल तर महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.आज (दि. 31)सकाळी मराठा समाज मंडळाच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष विजय देशमुख, मिलिंद देशमुख, रवींद्र चौधरी, सचिन चौधरी व पदाधिकाऱ्यांनी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द केले.
00000