कल्याण :महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे नुकतेच रुजू झाले. ते भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी असून राज्याच्या विविध भागातील प्रशासकीय कामाचा तब्बल ३३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
यापूर्वी जगदाळे हे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सहसंचालक पदावर कार्यरत होते. जगदाळे यांच्यासह राज्य शासकीय नागरी सेवेतील २३ अधिकाऱ्यांना नुकतीच भारतीय प्रशासन सेवा संवर्गात पदोन्नती मिळाली होती. त्यांनी सातारा येथे निवासी उपजिल्हाधिकारी व इतर विभागांची जबाबदारी पार पाडली आहे. उरमोडी व वांग मराठवाडी प्रकल्पांचे पुनर्वसन आणि लोणंद, फलटण या नवीन रेल्वे मार्गाचे भूसंपादन या कामांमध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे. अपर जिल्हाधिकारी असताना त्यांनी नंदुरबार तसेच धुळे येथे अपर जिल्हाधिकारी व बीड येथे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष आदी पदांवर काम केले आहे. नंदुरबार येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व धुळे येथील कोविड काळात जगदाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यावेळी भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, महाव्यस्थपाक अनिल बऱ्हाटे, अधीक्षक अभियंते नीलकमल चौधरी, दिलीप भोळे, दीपक पाटील, मोहन काळोखे, उप महाव्यस्थपाक योगेश खैरनार, सहाय्यक महाव्यस्थपाक हविषा जगताप व सुशिल पावसकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
