अनिल ठाणेकर
ठाणे : २९ डिसेंबरला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष छत्रपती संभाजी महाराजनगरचे १३ वे जिल्हा अधिवेशन गांधी भवन जवळील मैदानात पार पडले या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी भगवान भोजने यांचे जिल्हा सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. या अधिवेशनाचे उद्घाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य सुनील मालुसरे यांनी केले. यावेळी जेष्ठ कामगार नेते डॉक्टर कॉम्रेड डी .एल. कराड व कॉ. किसन गुजर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी मागील तीन वर्षाच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला यावर आलेल्या प्रतिनिधींनी चर्चा केली त्यानंतर महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामधे, २०२० चे शिक्षणाचे बाजारीकरण करणारे शैक्षणिक धोरण रद्द करा, कामगारांना देशोधडीला लावणारी कामगार संहीता रद्द करा, राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पक्षाने योग्य हस्तक्षेप करून जनतेचा लढा उभारावा, शेतकी मलाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये पक्षाने व्यापक संघटन उभे करावे या विविध ठराव पारित करण्यात आले. विद्यार्थी युवक कामगार शेतकरी शेतमजूर महिला एकजुटीच्या आधारावर आगामी काळात पक्ष बांधणी करून सामान्य जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करावा असा निर्धार याबद्दल अधिवेशनात करण्यात आला.
०००००
