Month: December 2024

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास गती द्यावी-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा ‘फ्लॅगशीप’ कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून विकासकांना काम करताना येत असणाऱ्या अडचणींचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा…

पार्ले महोत्सव २०२४ ची सांगता

मुंबई : कला-क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळीचा भाग ठरलेल्या आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखाली पार्ले महोत्सव २०२४ ची सांगता झाली असून गत वर्षाला निरोप देत आता नव्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षात हा महोत्सव साजरा होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आमदार पराग अळवणी आणि माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या हस्ते अंतिम स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पार्ले महोत्सवमय झाले होते. या महोत्सवात यंदा ६० हजारांहून अधिक खेळाडू आणि स्पर्धकांनी वेगवेगळ्या गटात भाग घेतला. त्याचबरोबर एकूण ३५०० जणांना पारितोषिके प्राप्त झाली. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले तर समारोपाच्या आदल्या दिवशी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उपस्थिती दाखवली. महोत्सवात पहिल्यांदाच दहीहंडी या साहसी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे, पालिका आयुक्त भूषण गगरानी, सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य तसेच अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला भेटी दिल्या. आगामी २०२५ हे वर्ष पार्ले महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे आतापासूनच कार्यकर्ते त्याचे नियोजन करून हा महोत्सव भव्यदिव्य करण्यावर भर देतील, या महोत्सवाची व्याप्ती अधिक वाढेल तसेच अधिक स्पर्धक, नवे खेळ यात समाविष्ट होईल, असे आयोजक आमदार पराग अळवणी यांनी याबाबत बोलताना सांगितले.

 अग्निशमन दलात चालक घोटाळा

एमबीएमसीमध्ये 127 चालकांऐवजी केवळ 40 ते 50 चालक कार्यरत आहेत.   अरविंद जोशी मीरा- ईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलात (अग्निशमन दल) चालक घोटाळ्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हा अधिकारी पवन घरत यांनी केला…

 सुपर ओव्हरमध्ये स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप विजयी

 ६६वी टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धा मुंबई : कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या लढतीत सुपर ओव्हरपर्यंत लांबलेल्या सामन्यात…

 डहाणूचा मनस्वी इंटरप्राईजेस संघ संदीप भुरभुरे चषकाचा मानकरी

‘परिवर्तन ग्रुप’च्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद   योगेश चांदेकर पालघरः मोडगाव येथील ‘परिवर्तन ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी क्रिकेटच्या महासंग्रामात ६४ संघांनी भाग घेतला. आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषकाचा मानकरी डहाणू तालुक्यातील चिखले येथील मनस्वी एंटरप्राइजेस संघ ठरला. या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. ‘परिवर्तन ग्रुप’ दरवर्षी संदीप भुरभुरे स्मृती चषक स्पर्धा भरवत असतो. गेली २४ वर्षे हा उपक्रम अखंड चालू असून पुढचे वर्ष हे या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या स्पर्धेचे सर्व नियोजन ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी हे करत असतात. दोन राज्ये एका केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी दादरा नगर हवेली, गुजरात, नंदुरबार, रायगड, मुंबई, मालाड, ठाणे, भिवंडी, नाशिक, जव्हार, वाडा, शहापूर, पालघर, वसई, बोईसर, डहाणू, तलासरी आदी ठिकाणचे संघ या स्पर्धेत भाग घेत असतात. दरवर्षी ही स्पर्धा नीटनेटक्या नियोजनाने चर्चेत असते. या वर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील मिळून ६४ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. दादरा नगर हवेली, गुजरातच्या संघालाहा पारितोषिक आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम २०२४ आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक डहाणूच्या मनस्वी इंटरप्राईजेस चिखले या संघाने मिळवला, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दादरा नगर हवेलीतील प्रिन्स खानवेल या संघाने मिळवला. तिसरा क्रमांक वसईच्या बेनापट्टी संघांनी मिळवला, तर चौथा क्रमांक गुजरातच्या खेडगाव नवसारी येथील संघाने मिळवला. या स्पर्धेत मनस्वी स्पोर्टस् चिखले डहाणू येथील संघ मालिकावीर ठरला. या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील भुसारा, पालघरचे माजी आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती  आणि ‘परिवर्तन ग्रुप’चे कार्याध्यक्ष प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. भुरभुरे यांचे मोठे योगदान गेल्या २४ वर्षांपासून आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम सुरू असतो. सुरुवातीच्या काळात संदीप भुरभुरे यांचा या स्पर्धेच्या नियोजनात मोठा सहभाग होता. त्यांचे प्रोत्साहन होते. मैदानापासूनच्या सर्वच गोष्टी ते हाताळत असत; परंतु कोरोनाच्या काळात त्यांचे पाच मे २०२१ रोजी निधन झाले. ॲड. काशिनाथ चौधरी यांनी त्यांच्याच नावाने पुढे स्पर्धा चालू ठेवत या चषकाला संदीप भुरभुरे स्मृती चषक असे नाव दिले. आता त्याच नावाने ही स्पर्धा होत असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी दोन राज्ये आणि  आणि केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी होत असतात. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. ०००००

सर्व प्रकरण सेट केल्यानंतर वाल्मिक कराडचे पोलिसांसमोर सरेंडर – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : ‘गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेंड वाल्मिक कराड हा सरेंडर करणार होता हे मी अगोदरच सांगितले होते. यापूर्वीच मी ट्विट केले आहे,’ सर्व प्रकरण सेट करण्यासाठी इतके दिवस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड पुणे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर केला आहे. संतोष देशमुख हे भाजपचे होते आमच्या पक्षाचे नव्हते, पण माणुसकी जिवंत राहावी यासाठी आम्ही लढतो आहोत.संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सरकारी वकील देताना त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेणं आवश्यक आहे. माझी फडणवीसांना विनंती आहे की, मागच्या दोन-तीन वर्षात झालेल्या हत्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याही कुटुंबियांना बोलवून घ्यावं. त्यावेळी कळेल की कोणी कोणाची जमीन बळकावली आणि कोणी कोणाची हत्या केली.” असाही घणाघात आव्हाड यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या जनतेला जोपर्यंत वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जनतेने शांत बसू नये असं आवाहनही यावेळी केलं. आव्हाड यांनी आणखी एका प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, एक हत्या तर भयंकर आहे त्याची माहिती माझ्याकडे आहे, पोरीला फोन लावून दिला गेला आणि फोनवरून मुलीला सांगितलं की एक तर तू गोळी मारून घे नाही तर याला गोळी मारून घ्यायला सांग. याचा संपूर्ण तपशील त्यांनी यावेळी दिला नाही. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत गंभीर आरोप करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “नैतिकदृष्ट्या मी समाजतील, राजकारणातील घडामोडी वाचत असतो, लक्षात ठेवत असतो. त्यावरुन राजकारणात आत्तापर्यंत एवढे मोठे आरोप कोणत्याही मंत्र्यावर झाले नाहीत. ०००००

 वामन म्हात्रेंची खेळी, किसन कथोरेंना धक्का

बदलापुरात भाजपचा माजी नगरसेवक शिवसेनेत बदलापूरः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला भाजपात प्रवेश देत आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांनी चक्क भाजपच्या माजी नगरसेवकालाच गळाला लावले असून हा किसन कथोरे यांना धक्का मानला जातो. विशेष म्हणजे आमदार कथोरे यांचे निवासस्थान याच प्रभागात येते. गेल्या काही दिवसात बदलापुरात कथोरे विरूद्ध म्हात्रे वाद टोकाला पोहोचला असून एकमेकांवर शाब्दीक हल्ले करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतो आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या किसन कथोरे यांचा पाचव्यांदा विजय झाला. मात्र त्याचवेळी बदलापुर शहरात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे किसन कथोरे यांच्यातील वाद टोकाला गेला. कथोरे यांच्या उमेदवारीला म्हात्रे यांनी निवडणुकीआधीच विरोध सुरू केला होता. त्यामुळे ऐन प्रचार रंगात येत असताना म्हात्रे यांनी प्रचारापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यातच आमदार कथोरे यांनी वामन म्हात्रे यांचा प्रभाव असलेल्या भागातील उपशहर प्रमुख तेजस म्हस्कर यांनाच भाजपात प्रवेश दिला. त्यामुळे शिवसेनेत संताप वाढला होता. म्हात्रे यांनी याबाबतची नाराजी थेट तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. तरीही शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळत कथोरे यांचाच प्रचार करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हा वाद टोकाला पोहोचला. विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात आमदार किसन कथोरे यांनी वामन म्हात्रे यांच्यासह सर्व पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधकांना थेट आव्हान दिले होते. म्हात्रे यांनी कथोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे यांच्यात वाकयुद्ध वाढल्याचे दिसत होते. मात्र वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजीत आगरी महोत्सवात पहिल्याच दिवशी भाजपचे बदलापूर गावातील माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर मंगळवारी चतुरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. माझा प्रवेश यापूर्वीच झाला होता. आता फक्त सदिच्छा भेट घेतल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी दिली. मी १३ वर्ष शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होतो. मी शिवसेनेकडून निवडणुकही लढवली होती. माझी बहीण शिवसेनेची नगरसेविका होती. मध्यंतरी मी भाजपात होतो. मात्र दोन वर्षांपासून मला प्रभागात काम करताना अडचणी येत होत्या. माझी घुसमट होत होती, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. हा प्रवेश आमदार किसन कथोरे आणि भाजपासाठी धक्का मानला जातो आहे. आमदार किसन कथोरे यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातून चतुरे नगरसेवक आहेत. त्यामुळे म्हात्रे यांनी विधानसभेतील फोडाफोडीची परतफेड केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ही तर घरवापसी शिवसेनेचा कार्यकर्ता आत शिवसेनेत आला. हा पक्षप्रवेश नाही तर घरवापसी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. हेमंत चतुरे शिवसैनिकच होते. त्यांचा परिवार शिवसेनेशी संबंधित आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बदलापुरात शिवसेना आणखी मजबूत होईल, असेही म्हात्रे  बोलताना म्हणाले.

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे

कल्याण :महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे नुकतेच रुजू झाले. ते भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी असून राज्याच्या विविध भागातील प्रशासकीय कामाचा तब्बल ३३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी…

 ‘मस्साजोग सरपंच हत्येच्या तपासाला गती मिळावी!’

शहापूर मराठा समाज मंडळाची मागणी   शहापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. हत्येचा तपास जलद गतीने व्हावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा  शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने शहापूर तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला आहे.बिड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. हत्या कटाच्या मुख्य सूत्रधारावर एका बड्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असून तपास प्रक्रियेतही हस्तक्षेप असल्याने त्यास अटक होत नसल्याने मराठा समाजाच्या सरकारप्रती भावना तीव्र आहेत. या गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा,तसेच योग्य तपास होणेसाठी एस.आय.टी. स्थापन करावी किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तपास कामात सातत्याने दिरंगाई होत असेल तर महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.आज (दि. 31)सकाळी मराठा समाज मंडळाच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष विजय देशमुख, मिलिंद देशमुख, रवींद्र चौधरी, सचिन चौधरी व पदाधिकाऱ्यांनी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द केले. 00000