Month: December 2024

ठाणे सिव्हीलमध्ये एकच दिवशी १०० बालकांवर हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेल्या बोटांवर शस्त्रक्रीया!

ठाणे: महागड्या रूग्णालयत लाखो रूपये खर्च करून लहान शस्त्रक्रिया करायची ऐपत सर्वांची नसते. पण त्यावर मात करण्यासाठी लहान मुलांवर जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास गरजू सध्या ठाणे सिव्हील रुग्णालय गोठत आहेत.…

एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

मुंबई : एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत मागील पाच वर्षांत सातत्याने घट होत आहे. २०१९-२० च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत ०.२ टक्क्यांनी घट झाली आहे. रुग्णांच्या संख्येत घट झाली असली…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे सौरभ काडगावकर यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुमति गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने सौरभ काडगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम ८ डिसेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

सिंधुदुर्ग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तोरसकर यांची बिनविरोध निवड..!

सिंधुदूर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रतिनिधीपदी गणेश जेठे यांचीही बिनविरोध निवड झाली. संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे:…

 एनआरएमयुचा ‘एक उद्योग, एक युनियन’ संकल्पना

भारतीय रेल्वे युनियन मान्यता निवडणुकीसाठी  जाहीरनामा   अनिल ठाणेकर एनआरएमयुने ‘एक उद्योग, एक युनियन’ या संकल्पनेसह भारतीय रेल्वेमध्ये २०२४ च्या युनियन मान्यता निवडणुकांसाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. जनरल सेक्रेटरी वेणू पी. नायर यांनी मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागातील मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना एनआरएमयु (मध्य रेल्वे/कोंकण रेल्वे) सोबत एकत्र येण्याचे आवाहन केले. वेणू पी. नायर, सरचिटणीस, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु मध्य रेल्वे कोंकण रेल्वे ), यांनी नुकतेच दादर रेल्वे इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात एन आर एम यु च्या ‘निवडणूक जाहीरनामा’ किंवा ‘संकल्प पत्र’ चे अनावरण केले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि विशेषतः मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे कागदोपत्री वचन आहे.  हे मागण्या पूर्ण करण्यासाठी एक व्यापक रोडमॅप देखील तयार करते आणि ते “एक उद्योग, एक संघ” दर्जा प्राप्त करून सर्व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे समर्थन करते. दस्तऐवजात ६२-पॉइंट मागण्यांचा एक चार्टर सादर केला आहे, ज्यात मुख्य चिंता, आकांक्षा आणि सुधारणांचा उद्देश आहे ज्याचा उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीचे रक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे, ज्यामुळे सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे नेटवर्क सुनिश्चित करणे. जुनी पेन्शन योजना (ओ पी एस) पुनर्संचयित करणे: ८ व्या वेतन आयोगाची निर्मिती:उत्पादकता लिंक्ड बोनस (पी एल बी) साठी कमाल मर्यादा काढून टाकणे:एम ए सी पी एस साठी सेवा पात्रता कालावधी १० वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत कमी करणे.पाच वर्षांच्या पुनरावलोकनासह सेवानिवृत्तांसाठी वैद्यकीय भत्त्यात वाढ.अंदाधुंद आउटसोर्सिंगला विरोध करणे आणि सर्व सुरक्षा आणि गैर-सुरक्षा श्रेणीतील रिक्त पदे भरणे सुनिश्चित करणे. नवीन मालमत्ता, विद्युतीकरण प्रकल्प आणि गाड्यांचे विस्तारित ऑपरेशन यासाठी भरती.महिला कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण: कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, मासिक पाळीची रजा आणि चांगल्या बाल संगोपन सुविधांसाठी वचनबद्धता. बाल संगोपन रजा दरम्यान वेतन पूर्ण पुनर्संचयित.रनिंग स्टाफसाठी उत्तम वैशिष्ट्ये: जसे की ८ तास ड्युटी रोस्टरची अंमलबजावणी आणि विश्रांतीचा कालावधी वाढवला. क्रू लॉबी आणि रनिंग रूममध्ये राहण्याची उत्तम परिस्थिती व सुविधा देणे. करिअर विकासावर लक्ष केंद्रित करणे.वेळेवर पदोन्नतीसाठी नियमित जी डी सी इ आणि एल डी सी इ परीक्षा आयोजित करणे.विविध श्रेणींमध्ये वेतन संरचना सुधारण्यासाठी तरतुदी.रेल्वे वसाहती, क्वार्टर आणि वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी पुरेसा निधी.कारखान्यांमधील यार्ड आणि कर्मचारी सुविधांमध्ये सुरक्षा-अपग्रेड करणे. सर्व सुरक्षा श्रेणीतील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी जोखीम आणि त्रास भत्ते. पर्यवेक्षक, ट्रॅक मेंटेनर आणि फॅक्टरी कामगारांसाठी करिअरच्या प्रगतीसाठी आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठी तरतूद. चौकट लॉन्च इव्हेंटमध्ये बोलताना वेणू पी. नायर यांनी खाजगीकरण आणि आउटसोर्सिंगच्या वाढत्या आव्हानांवर प्रकाश टाकला आणि एकतेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “आमचे कर्मचारी, आमचे रेल्वे उद्योग आणि आमचे हक्क सुरक्षित ठेवण्याची वेळ आली आहे.”  “एक उद्योग, एक युनियन” च्या माध्यमातून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना एकसंध आवाज देणे, सन्मान, सुरक्षितता आणि समृद्धी सुनिश्चित करणे, ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे भारताच्या वाढीची जीवनरेखा असल्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांच्या सहकाऱ्यांना डायरी वाटप

नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, अनेक पुरस्कार विजेते व गार्डन ग्रुप ७ :‌५० समूहाचे खजिनदार श्री. रणवीर धनराज पाटील  यांनी २९ नोव्हेंबर  २०२४ रोजी गार्डन ग्रुप मधील आपल्या…

घाटकोपर फलक दुर्घटना भावेश भिंडेची दोषमुक्ततेची मागणी

मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याने आता प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी…

नाशिककरांना हुडहुडी!

 शहरात पारा १०.५ अंशावर, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद   हरिभाऊ लाखे नाशिक: राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना शहरात गुरुवारी किमान १०.५ तर कमाल २७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडचा पारा गुरुवारी पहाटे अवघ्या ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील २४ तासांकरीता थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली अहे. तर पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. शहरात गुरुवारी किमान १०.५, तर कमाल २७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. बुधवारी किमान १०.६, तर कमाल २७.५ अंश सेल्सिअस आणि मंगळवारी किमान १०.८, तर कमाल २८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. राज्यात नाशिकच्या खालोखाल अहिल्यानगर आणि पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी अहिल्यानगरमध्ये ९.४, तर पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडचा पारा घसरला निफाड : गेल्या तीन-चार दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडीचा पारा सातत्याने घसरत असून, गुरुवारी कुंदेवाडी येथील निफाड गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील निफाड येथे नीचांकी तापमान होते. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या होत्या. कडाक्याच्या थंडीने सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गुरुवारी मात्र चांगलीच वाढली होती. निफाड तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष बागांच्या शेंड्यांच्या वाढीवर परिणाम होईल. मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ००००

 कर्व्हालो कुटुंबीयांनी जपले दोनशे वर्षांचे गुलाबी लसणाचे वाण

 नव्वद वर्षांच्या निकलस आजोबांची वाण जतनासाठी धडपड   योगेश चांदेकर पालघरः अलीकडच्या काळात शेती करणे कठीण झाले आहे. त्यात वसई सारख्या परिसरात तर शेतीऐवजी उद्योग आणि नोकऱ्या करण्याकडे लोकांचा कल आहे. अशा परिस्थितीत वसई तालुक्यातील गिरीज गावातील मारोडेवाडी येथे निकलस कर्व्हालो, त्याचे चिरंजीव अनिल आणि सून हर्षाली यांनी वाडवडीलांची गुलाबी लसणाच्या शेतीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.अवघ्या दोन गुंठ्यांत हे गुलाबी लसणाचे हे वाण जिवंत ठेवण्यासाठी हे कुटुंब अतोनात कष्ट घेत असून पालघर जिल्ह्यात यांच्या व्यतिरिक्त हे उत्पन्न कुठेही घेतले जात नाही त्यामुळे त्यांच्या लसणाचा सुगंध दूरवर दरवळत असून लसूण लागवडी अगोदरच खरेदीचे बुकिंग झालेले असते. वसई जवळ कर्व्हालो कुटुंबीयांची शेती आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. केळी, कांदा बोकर्ली, वांगी, फ्लावर्स, बनकेळी आदी पिके घेतली जातात. हे कुटुंब बाहेरून फारसे काही खरेदी करत नाही. तेल वगळता अन्य गरजा या त्यांच्या शेतीतून पूर्ण होतात. टाळेबंदीच्या काळात तर त्यांचे सर्व कुटुंब शेतीतील उत्पादनावरच जगत होते; उलट बाहेर सर्व बंद असल्याने त्यांना शेतीतील पिकांतून जादा उत्पन्न मिळाले. गुलाबी लसणाच्या शेतीत पडला नाही खंड अन्य पिकांच्या साखळीत जरी बदल करीत असले, तरी गुलाबी लसणाची शेती मात्र ते कायम करतात. अर्थात ती फार मोठ्या क्षेत्रावर केली जात नाही. वसई पश्चिम मधील गिरीज तलावानजीक मारोडे भागात त्यांची ही लसणाची शेती आहे. या परिसरातील जमीन अतिशय कडक असते; परंतु अनिल स्वतःच्या पावर ट्रिलरने तीन-चार वेळा मशागत करून ती भुसभुशीत करतात. त्यात शेणखत घातले जाते. कर्व्हालो कुटुंबीयांनी रासायनिक खतांना दूर ठेवले असून सेंद्रिय खते आणि शेणखतावरच भर दिला आहे. लसणाची शेती फारच अवघड लसणाची शेती तितकीशी सोपी नाही. एकेक पाकळी स्वतंत्र करून खणप्याने अर्धा इंच खोल पाकळी लावावी लागते. दोन पाकळ्यांच्या मध्ये वितभर अंतर ठेवावे लागते. हा लसूण रुजायला पंधरा दिवस लागतात. लसूण लावल्यानंतर त्याला पोहोच पाणी दिले जाते. पाणी जास्त दिले, तर लसूण सडण्याचा धोका असतो. त्यामुळे पोहोच पाणी ठराविक अंतराने द्यावे लागते. पंधरा दिवसानंतर कुठे लसूण पातळ झाला असेल, तर पुन्हा मोकळ्या जागी दुसऱ्यांदा लसणाची लागवड करावी लागते. जमिनीचा पोत बिघडू नये, म्हणून निर्माल्यापासून तयार केलेले खतच या गुलाबी लसणाच्या शेतीसाठी वापरले जाते. एरवी दर दहा दिवसांनी पाणी दिले जाते, तर ऊन वाढल्यानंतर मात्र आठ दिवसांनी पाणी द्यावे लागते. नव्वद दिवसात लसून तयार होतो. त्या अगोदर त्यावर करपा पडायला लागला, तर फवारणी करावी लागते; शिवाय दव पडण्याच्या काळात अधिक लक्ष द्यावे लागते. एकदा लसूण तयार झाला, की ते आपोआप कळते. गुलाबी लसणाला आयुर्वेदिक महत्त्व पात पडायला लागली की लसून काढणीला आला, असा त्याचा अर्थ होतो. लसणाची शेती करणेही कांद्याइतके सोपे नसते, खुडणार नाही अशा पद्धतीने लसून काढावा लागतो. शेतातच २०-२५ दिवस तो सुकून ठेवावा लागतो. नंतर अर्धा अर्धा किलोचे पॅक तयार करून ते घरातील माळ्यावर ठेवले जातात. या गुलाबी लसणाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. लसून आणि गूळ खाल्ल्याने अनेक व्याधी दूर होतात. कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तर रक्त पातळ होते. लसूण माळ्यावर ठेवला, की घराबाहेर त्याचा सुगंध जातो. त्यामुळे आमच्याकडे लसूण आहे हे सर्वांना समजते, असे हर्षाली यांनी सांगितले. दोनशे वर्षापासून आजोबा, पणजोबांनी जपलेले गुलाबी लसणाचे वाण जपण्यासाठी निकलस, अनिल आणि हर्षाली खूप कष्ट घेतात. मजूर मिळत नसल्याने समस्या कर्व्हालो कुटुंबीयांच्या लसणाची ख्याती दूरवर पसरली असून लसून लागवडीच्या अगोदरच त्यांच्याकडे आगाऊ नोंदणी केली जाते. कधी कधी एक एक वर्ष अगोदर नोंदणी असते. विशेषतः ज्यांच्या घरात लग्न आहे, त्यांच्याकडून तर हमखास गुलाबी लसणाची मागणी येते. अलीकडच्या काळात शेती परवडत नाही. विशेषतः कोकणातील शेती तुकड्या तुकड्याची आहे. त्यामुळे मशागत करता येत नाही; शिवाय मजूर मिळत नाही. ही वेगळी समस्या असतानाही कर्व्हालो कुटुंबीयांनी आपल्याशी मजुरांची एक टोळी कायम जोडून ठेवली असून, या महिलांच्या मदतीने लसूण लागवड आणि काढणीपर्यंतची सगळी कामे केली जातात. निकलस आजोबांना आता शेती परवडत नाही, त्यामुळे शेती सोडण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याची खंत आहे. कोट ‘आपण केवळ आवडीमुळेच हे गुलाबी लसणाचे वाण जतन करण्यासाठी झटपटतो आहोत. माझ्या मुलाने आणि सुनेने शेती जपली आहे, याचा मला अभिमान आहे. पुढच्या काळात कोणी शेती करील, की नाही याबाबत संभ्रम आहे. -निकलस कर्व्हालो, गुलाबी लसून उत्पादक

 काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचे धान्य संतप्त ग्रामस्थांनी पकडले

 जरंडी गावातील घटना..   सोयगाव : चार चाकी वाहनाद्वारे  काळ्या बाजारात रेशन चा गहू,तांदूळ विक्रीसाठी घेऊन जाणारे अकरा क्विंटल धान्य संतप्त ग्रामस्थांनी  शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चार चाकी वाहन अडवून जरंडी गावाजवळ पकडले दरम्यान वाहनांच्या मागे पुन्हा तीन मोटारसायकल वरही धान्य आढळून आल्या मुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.. सिल्लोड तालुक्यात काळ्या बाजारात रेशन चे गहू तांदूळ धान्याच्या गोण्या विक्रीसाठी घेऊन जरंडी गावाजवळ संतप्त ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले दरम्यान ग्रामपंचायतने स्थानिक पंचनामा करून उपसरपंच संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील यांनी सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी वाहनांसह तीन गोण्या गहू,सात गोण्या तांदूळ, अंगणवाडी पोषक आहार-दोन गोण्या,एक गोणी ज्वारी असे एकूण अकरा क्विंटल रेशनचे धान्य जरंडी गावातून जप्त केले आहे या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे जरंडी गावाकडून सिल्लोड कडे ओमीनी गाडी क्र-एम एच-४३,व्ही-६२८८ मध्ये व मोटारसायकल क्र-एम एच-२० बी व्ही-००८२,एम एच-२० ए व्ही-९४८२ आणि एम एच-२०,ए यु-९६७९  काही गोण्या दुचाकी वर रंगेहाथ पकडून  अफरोज हमीद शेख,समीर शेख हमीद, मिरज शेख खलील, जुबेर शेख(चारही रा शिवना ता सिल्लोड,)इकबाल तडवी(रा निंबायती ता सोयगाव),शेख नाजीम शेख चांद(रा सोयगाव)व इतर चार अश्या दहा जणांच्या ताब्यातून रंगेहाथ पकडले  दरम्यान सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती देताच घटनास्थळी धाव घेत सदर रेशन चे गहू तांदूळ असे अकरा क्विंटल धान्य  सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तगत केले अद्याप सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.