Month: December 2024

गोंदेगावात मोटारसायकल गॅरेज आगीत भस्मसात

– सहा लाखांचे नुकसान; रात्री दोन वाजेची घटना सोयगाव-सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव चौफुली वर असलेल्या  स्वामी समर्थ ऑटो गॅरेजला शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून गॅरेजच्या दुकानाचा अक्षरशः कोळसा झाला…

सहलीसाठी उतरविला ८२ विद्यार्थ्यांचा विमा

 जरंडीच्या फुले विद्यालयात पालकाच्या संमतीसाठी बैठक सोयगाव : डिसेंबर महिना शालेय शैक्षणिक सहलीचा महिना आहे त्यासाठी मात्र गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, यांच्या परवानगी शिवाय पालकांची संमती आवश्यक केल्या मुळे शनिवारी जरंडीच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात पालकांच्या संमती साठी बैठक आयोजित करण्यात आली होती जरंडी च्या फुले विद्यालयाची २६ ते २९ या चार दिवसांच्या कालावधीत कोल्हापूरसह विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी एसटीला पालकांची संमती आवश्यक असल्याने ही बैठक घेऊन मुख्याध्यापक एस एन महाजन यांनी सहलीची माहिती दिली यावेळी त्यांनी पालकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांजवळ घरचे मोबाईल क्र देण्याचे सांगून पालकांची संमती घेतली दरम्यान एस टी ला विद्यार्थ्यांचा विमा आवश्यक असल्याने सोयगाव आगारने जरंडीच्या ८२ विद्यार्थ्यांचा विमा उतरविला आहे दरम्यान बैठकीत राजेंद्र वाघ,आर आर हनुमंते,श्रीमती सुजाता शिंदे आदींची उपस्थिती होती यावेळी उपसरपंच संजय पाटील, साईदास पवार दिलीप महाजन, आदींनी समस्या मांडल्या दरम्यान यावेळी बनेखा तडवी, अनिल महाजन, नंदू महाजन, अनिल जाधव,सांडू जाधव, विकास राठोड, ज्ञानेश्वर महाजन समाधान चव्हाण सोपान पाटील,अनिल पाटील,आदींसह पालकांची उपस्थिती होती. 000

‘भुजबळांनी तर पंतप्रधान व्हावं’

 माणिकराव कोकाटेंचा टोला हरिभाऊ लाखे नाशिक -सरकार स्थापन होऊन ४ दिवस झालेत, दम तर काढला पाहिजे. छगन भुजबळांना जे वाटतं ते त्यांनी मागावे. मला वाटतं भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावे. मला काय…

५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश-चंद्रकांत सूर्यवशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २२ डिसेंबर १ वाजल्यापासून ते  ५ जानेवारी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात २५ डिसेंबरला नाताळ सण तसेच ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागत समारंभ साजरे होणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यात समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सद्या राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचे पडसाद सणादरम्यान पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

  ठाणे –  सुधागड तालुका रहिवाशांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या ठाणे शहरातील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या संस्थेच्या 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, उपाध्यक्ष शंकर काळभोर, सांस्कृतिक कार्यप्रमुख जनार्दन घोंगे, उद्योजक चिमाजी कोकाटे, सल्लागार विठ्ठल खेरटकर, रमेश सागळे, गणपत डिगे, अनिल सागळे, सुरेश शिंदे, क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे, अंतर्गत हिशेब  तपासणीस दत्ता सागळे, कार्यकारी सदस्य अनिल चव्हाण, राम भोईर, श्याम बगडे, सखाराम चव्हाण, सखाराम घुले, भगवान तेलंगे, राजेश बामणे, प्रवीण बामणे, प्रसिद्धीप्रमुख अजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिक्रमण विभागाच्यावतीने अनधिकृत बांधकामाविरोधात कोपरखैरणे विभागात कारवाई

  नवी मुंबई : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे  यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत एस सणस, SS टाईप,रूम नं 941, सेक्टर-3, कोपरखैरणे, नवी मुंबई, यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती.  सदर बांधकामावर  तोडक कार्यवाही करण्यात आली. सदर बांधकाम धारकांकडून रु.10,000/- दंड वसूल करण्यात आला. तसेच, कोपरखैरणे विभागातील फेरीवाला व  दुकानांवर मार्जिनल स्पेस कारवाई करण्यात आली व एकूण 12500/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. कोपरखैरणे विभागातील सेक्टर 9 येथील एकूण 9 झोपड्या हटविण्यात आल्या. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व  इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी नमुंमपा पोलीस बंदोबस्त होता. तसेच 8 मजूर, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर 01,पिकअप व्हॅन 01 कारवाई करीता वापर करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

बोटिंगसुविधा उपलब्ध असलेल्या तलावांवर सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी – सौरभ राव

  अनिल ठाणेकर ठाणे : गेट-वे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटींग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  दिल्या आहे. महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३५ तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबेघोसाळे या  ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मासुंदा तलाव येथे ३५ पॅडल बोट व २ मशीन बोट, उपवन तलाव येथे १६ पॅडल बोट व १ मशीन बोट तर आंबेघोसाळे तलाव येथे ४ पॅडल बोट व १ मशीन बोट उपलब्ध आहे.  सदरकामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच बोटींगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांस सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी, जे नागरिक याला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देवू नये असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच बोटीमध्ये बुयॉस रिंग रोप सेफ्टी जॅकेट ठेवणे याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. आज  पर्यावरण्‍ विभागाच्या उपायुक्त डॉ. पदमश्री बैनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देवून सर्व गोष्टींचा आढावा घेतला, व बोटिंगसंदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.महापालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे  बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावे असेही आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

चटका लावून जाणारी निवृत्ती

भारताचा अव्वल ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. रविचंद्रन आश्विन याच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेट रसिकांना धक्का बसला कारण त्याची निवृत्ती…

शंभर कोटी मुले हवामानबदलाच्या विळख्यात

जगभरातील शंभर कोटींहून अधिक, विशेषत: भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि नायजेरिया अशा कमी विकसित देशांमध्ये राहणाऱ्या मुलांना हवामानबदलामुळे वाढत्या धोक्यांचा सामना करावा लागतो. त्यांना आधीच स्वच्छ पाण्याची अनुपलब्धता,…