Month: December 2024

मुंबईत सकल मराठा समाजाचे आंदोलन

 मृत सरपंच देशमुख, परभणीतील सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय द्या मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी व परभणी येथील दलित समाज बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी दोन्ही…

– विवळवेढे उड्डाणपुलावर भीषण अपघात

– टँकर मधून रसायन गळती डहाणू: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे उड्डाणपुलावर सोमवार ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास रसायन वाहतूक करणाऱ्या टँकर ने सिमेंट पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. अपघातात टँकर फुटून मोठ्या प्रमाणत रसायनाची गळती झाली असून चालक टँकर मध्ये अडकला आहे. तर सिमेंट पाईप वाहून नेणाऱ्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. दरम्यान स्थानिकांनी टँकर मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रसायन गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रसायन ज्वलनशील नसल्याची खात्री पटल्यानंतर नागरिकांनी वाहनजवळ जाऊन मदतकार्य सुरू केले आहे.

डोंबिवलीत औषध विक्रेत्याला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक

डोंबिवली : येथील एका औषध विक्रेत्याला शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी दुकानातून खेचून रामनगर पोलीस ठाण्यात आणले. औषध दुकान जबरदस्तीने बंद पाडण्यास भाग पाडले. या घटनेचा निषेध म्हणून…

कल्याणमधील मुरबाड रस्त्यावरील प्रेम ऑटो चौकातील लांबलचक खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

कल्याण : कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग…

माजी महापौर दिवंगत सतीश प्रधान यांना

– ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि माजी खासदार सतीश प्रधान यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली. सतीश प्रधान यांचे रविवार, २९ डिसेंबर रोजी निधन झाले. सोमवार, ३० डिसेंबर रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, विधि अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ठाण्याचे सुपूत्र सतीश प्रधान यांचे ठाणे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौरपद भुषविले. ते २१.०३.१९८६ ते ३०.०३.१९८७ या काळात महापौर होते. तत्पूर्वी, ठाण्याचे नगराध्यक्ष आणि महापौरपदानंतर राज्यसभेचे दोनदा खासदार झाले.

खर्चिक प्री-वेडींगला आगरी समाजाचा विरोध

बदलापूर : दिमाखदार लग्न सोहळ्यासोबतच गेल्या काही वर्षात प्री-वेडींग अर्थात लग्नपूर्व चित्रण करण्याची पद्धत वाढली. यात मोठा पैसा खर्च होतो. तसेच हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे आगरी विवाहांमध्ये असे…

सोमवती अमावस्येनिमित्त गोदावरीच्या रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

हरिभाऊ लाखे नाशिक : सोमवती अमावास्येला धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्व असून या वर्षाच्या यंदाची शेवटची सोमवती अमावस्या असून ती मार्गशीर्ष महिन्यात आल्याने हा मुहूर्त विशेष मानला जात आहे. ही संधी साधण्यासाठी सोमवारी पहाटेपासून रामकुंडावर भाविकांनी गोदा स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली आहे. भाविक स्नान करून कपालेश्वर व बाणेश्वर महादेव मंदिरात जाऊन मनोभावे शिवपूजन करीत आहेत. महिला भाविकांची संख्या लक्षणीय असून पहाटेपासूनच गोदावरीपूजन व देशदर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे. हिंदू धर्मात अमावस्येच्या तिथीला खूप महत्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगळे नाव वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मात्र, काही अमावस्यांना विशेष महत्व आहे. त्यापैकीच सोमवती अमावस्या एक आहे. जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व हिंदू धर्मात आषाढी ते कार्तिक या चातुर्मासात भगवंत उपासना सांगितली आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. सोमवती अमावस्येला महत्त्व असून, या दिवशी शिव आराधना केली जाते. यादिवशी शिव शंकराचे पंच महाभूतात्मक पंचमुख दर्शन होत असल्याचे, ज्योतिषाचार्य सांगतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्येला दान व स्नान आदींचे महत्व असून, यादिवशी शिव शंकराची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. सोमवती अमावस्या असल्याने गोदावरी नदीवरील रामकुंडावर भाविक स्नानासाठी हजर होत असून गोदाघाटावर होणारी गर्दी लक्षात घेता पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून होत आहे. काही भाविकांकडून फुले व दीप गोदेच्या प्रवाहात सोडले जात असल्याने निर्माल्य हे अमृतकलशामध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात येत असून गोदावरीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून करण्यात आले आहे. विशेषतः महिला भाविक स्नान करून बाणेश्वर व कपालेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन घेत आहेत. कपालेश्वर मंदिरात यानिमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी पहावयास मिळत आहे. भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या परिसरात पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ०००००

महापालिकेच्या डास प्रतिबंधाच्या नियमास गृहसंस्थांचा विरोध

 कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास आळीनाशक औषधांची फवारणी करण्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढल्यानंतर यास आता गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. परिपत्रकानुसार गृहसंकुलात डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेच्या या परिपत्रकाचा गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. तसेच महापालिकेच्या कारवाईला देखील सामोरे जाण्याचा तयारी दर्शविली आहे. तसा ठरावच संघटनेने केला. संघटनेच्या या निर्णयास ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे आता वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्ह्याच्या सहकार विभागाच्या वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अधिवेशन भरविले होते. यावेळी गृहनिर्माण संस्थांचा पूनर्विकास, समस्या याविषयी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून फवारणी केली जाते. महापालिकेने नुकताच एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहसंकुलांना स्वत:च डास प्रतिबंधक फवारणी करावी लागणार आहे. तसेच डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेने गृहनिर्माण संकुलांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. या निर्णयास दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन या गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला. संमेलनामध्ये फेडरेशनचे महापालिकेच्या परिपत्रकाचा विषय निघाला. फवारणीचा खर्च उचलणार नाही. गुन्हा दाखल झाल्यास त्यास आम्ही तयार आहोत. लोकप्रतिनिधींनी हा विषय प्राधान्यांने मांडायला हवा असे ते म्हणाले. यास खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दिला. फवारणी करण्यासाठी महापालिका पत्रक काढत असेल तर नागरिकांनी हे पैसे भरू नका असे म्हस्के म्हणाले. असे परिपत्रक महापालिकेने तातडीने रद्द केले पाहिजे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तातडीने हे परिपत्रक रद्द करून घेऊ असेही केळकर म्हणाले. कचरा, मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते आम्हीच स्वच्छ करायचे. आता डासांचा प्रतिबंधही आम्ही करायचा, मग महापालिका केवळ दंड लावून कर घेणार का? ठाणे महापालिकेच्या निर्णयाला आमचा पूर्णत: विरोध आहे. -सिताराम राणे, अध्यक्ष, दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन. मुख्यमंत्र्यांचा मोबाईलद्वारे संवाद देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. या कार्यक्रमास भाजपचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. फडणवीस यांनी दरेकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून उपस्थितांशी संवाद साधला. या संमेलनातील निर्णय, अडचणींबाबत मुंबईत बैठक बोलविणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तक्रारीत ठाणे जिल्हा अग्रेसर कोकण विभागातील गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारींपैकी ८० टक्के तक्रारी या ठाणे जिल्ह्यातील असतात. यामध्ये निवडणुक, परिक्षण, विशेष सभा, पूर्नविकास या विषयांवरील तक्रारी अधिक आहेत. कायद्याच्या अभावामुळे या तक्रारी वाढलेल्या दिसून येते. गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि तक्रारदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच तक्रारी वाढत असल्याचे सहकार विभागाचे सह-निबंधक मिलिंद भालेराव यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० हजाराहून अधिक सोसायट्या आहेत त्यापैकी केवळ ५० टक्केच सोसायट्यांचे परिक्षण झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 00000

मुंबई नाशिक महामार्गावर कारला लागलेल्या आगीमळे महामार्गावर वाहतुक कोंडी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील दिवे अंजूर भागात सोमवारी सकाळी एका कारला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या…

‘माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही’

अंबरनाथ : ‘माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर हे लातूरहून अंबरनाथमध्ये परतल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी त्यांची भेट घेतली. किणीकर यांच्या…