Month: December 2024

ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा सन्मान 

 बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच राज्यातील विविध भागात शास्त्रीय संगीत आणि भजन संगीतचा प्रचार व प्रसार करत सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने सहस्रचंद्र सोहळा समारंभपूर्वक संपन्न झाला. विशेषत्वाने बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हृद्य सोहळा पार पडला. धार्मिक आणि सामाजिक समारंभ असलेल्या या सोहळ्यात  ह .भ.प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे पूजन करण्यात आले. त्यांनतर जवळपास ५० किलो पैशाची नाणी, मिठाई आणि सुकामेवा या साहित्यातून तुला करण्यात आली. विशेष म्हणजे  बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मातोश्री पार्वती यांचा सहा वर्षांपूर्वी सहस्रचंद्र सोहळा झाला होता. त्यानंतर हा सन्मान निवृत्तीबुवा चौधरी यांना मिळाला. त्यामुळे निवृत्तीबुवा चौधरी यांच्या रूपाने भजन परंपरेचा अलौकिक सत्कार या निमिताने झाला. ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे झालेल्या या सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.  मूळचे पनवेल तालुक्यातील रांजणपाडा येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीतून हजारो शिष्य घडविले. संगीत क्षेत्राच्या उत्थानासाठी त्यांनी ६० वर्षापेक्षा जास्त काळ अविरतपणे काम केले आहे. आजही त्यांचे हे कार्य पुढे सुरूच आहे. त्यांच्या शिकवणीतून तयार झालेले शिष्यांचीही या क्षेत्रात नाव उज्वल केले आहे.  ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे कार्य समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या देखरेखीत हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी भावनेतून संपन्न झाला. दरम्यान या सोहळ्यात निवृत्तीबुवा चौधरी यांचे सुश्राव्य भजनही झाले. त्यानंतर रायगड भूषण पं. उमेश चौधरी, शिवमाला पाटील, श्रुती पाटील यांचे अभंग गायन झाले. त्यांना नादब्रम्ह साधना परिवाराने साथ दिली.

तारापूर येथील अनेक कंपन्यांनी आमदार भाई जगताप यांच्या युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारले

मुंबई : भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ५  डिसेंबर रोजी बोईसर मधील तारापूर एम्.आय.डि.सी.येथील मे. साळवी केमिकल्स लिमिटेड, मे. केशव…

आंबेकर स्मृती संतप्ताहाला आजपासून आरंभ!

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक स्व.गं.द. आबेकर यांच्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ ७ ते १३ डिसेंबर पर्यंत विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमाने स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.संघटनेचे…

आंबोली – मांगेली वन पट्ट्यात आढळले ८ पट्टेरी वाघ…!

 वन विभागाकडून विविध उपाययोजना सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात आंबोली – मांगेली या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघ असल्याची नोंद झाली आहे. राज्याचा वनविभाग,सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ कंझरवेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून जानेवारी ते मे (२०२४) दरम्यान ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह ‘आणि  कर्नाटकातल्या ‘काली टायगर रिझर्व्ह’ या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असता सिंधुदुर्गातील आंबोली – मांगेली या कॉरिडॉर मध्ये ही नोंद झाली आहे. या वाघांमध्ये ५ मादी व ३ नर वाघांचा समावेश असून  वनखात्याने वेगवेगळ्या ठिकाणी बसविलेल्या कॅमेऱ्यात हे सर्व वाघ आणि वाघिणी कैद झाल्या आहेत.या आधी सुद्धा झालेल्या सर्वेक्षणात या पट्ट्यात वाघांचे वास्तव्य असल्याचे समोर आले होते.काही स्वयंसेवी सेवी संस्थानी ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये या परिसरात वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले होते.दोन वर्षापूर्वी आंबोली वनक्षेत्र  परिसरात वाघ एका गाईला खात असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.मात्र वन विभागाकडून वाघांचे अस्तित्व या परिसरात असल्याचे नाकारण्यात आले होते.काही महिन्यापूर्वी दोडामार्ग तालुक्यात भेकुर्ली परिसरात दिवसाढवळ्या वाघ वावरत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वनशक्ती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आंबोली – मांगेली हा ‘व्याघ्र कॉरिडॉर ‘ म्हणून संरक्षित व्हावा यासाठी उच्च न्यायालयात एक सार्वजनिक हिताची याचिका दाखल केली होती व या परिसरात वाघांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी लावून धरली होती. संस्थेचे प्रमुख दयानंद स्टॅलिन यांनी या पट्ट्यात तब्बल ५० वाघांचा वावर असल्याचा दावा केला होता.अन्य एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आल्याचेही म्हटले होते. वनखात्याने सर्वेक्षण केल्यानंतर या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणात वाघांचे वास्तव्य समोर आल्याने आणि इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने वाघांचे अस्तित्व असल्याची नोंद झाल्याने वनविभाग आता सतर्क झाला आहे. या परिसरात वाघांचे वास्तव्य लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनखात्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत.रात्रीची गस्त वाढविण्यात येणार असून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शिकारी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दोन तालुक्यातील ज्या गावांमध्ये या वाघांचे वास्तव्य आढळून आले आहे ती सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेली २५ गावे ही ‘ ईको सेन्सिटिव्ह ‘ म्हणून घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्य शासनाला दिले आहेत.

डॉ. नरेन्द्र जाधव  यांनी लिहिलेल्या डॉ आंबेडकर भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचे प्रकाशन सकाळी ६ डिसेंबर महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री…

नवी मुंबई महानगरपालिका जाहिर शिबिरांचा नागरीकांनी घेतला लाभ

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये हिवताप /डेंग्‍यु आजाराचा प्रसार रोखणेसाठी, मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले असता सदर सभांकरीता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.…

 उल्हासनगरात दिड लाखाचा गुटखा जप्त

 ६ जणावर गुन्हा, तिघांना अटक   उल्हासनगर : स्टेशन परिसरातुन काही व्यक्ती सफारी बॅगमध्ये प्रतिबंधित गुटखा बुधवारी सकाळी घेऊन जाणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून एकूण ६ जणांना ताब्यात घेतले. एकूण १ लाख ६५ हजाराचा गुटखा जप्त केला असून ताब्यात घेतलेल्या ६ मध्ये ३ महिलांनाचा समावेश आहे. उल्हासनगरात गेल्या आठवड्यात मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडी टाकून ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी बुधवारी सकाळी उल्हासनगर स्टेशनला परिसरातून एका बॅग मध्ये गुटखा घेऊन जाणाऱ्या एका टोळीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. ताब्यात घेतलेल्या सहा जणा मध्ये ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या टोळीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुटखा कुठून आणला व कुठे नेण्यात येत होता. याबाबतची चौकशी पोलीस करीत होते. जप्त केलेल्या गुटक्याची किंमत १ लाख ६५ हजार रुपयाची असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. अटक केलेल्या ३ पुरुष आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

अ.भा. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात (हेडिंग)

 १९ ते २२ डिसेंबर भरगच्च कार्यक्रम, साहित्य संमेलनही होणार  मुंबई : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन १९ ते २२ डिसेंबर दरम्यान पुणे येथे होणार आहे .दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस हा सोहळा होणार असून श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट संस्थेने त्याची जय्यत तयारी केली आहे. देशभरातील असंख्य दैवज्ञ बांधव या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. याचवेळी दहावे दैवज्ञ साहित्य संमेलनही पुण्यनगरीत रंगणार आहे. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन व दहाव्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचा भव्य सोहळा गुरूवारी १९ ते रविवारी २२ डिसेंबरपर्यंत पुण्यातील शुक्रवार पेठ येथील गणेश कला क्रीडा मैदानावर होणार आहे. गुरूवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रा निघणार असून शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता उद्घाटनाचा सोहळा होणार आहे.  पद्माकरराव पांडुरंगपंत रत्नपारखी व स्व. सुमती रत्नपारखी नगरीत सकाळी १० वाजता केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत  डॉ. गजानन रत्नपारखी व अजय कारेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दैसपचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्यासह डॉ. गजानन रत्नपारखी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवाद रंगणार शनिवारी सामाजिक कार्यात युवांची वानवा, ज्ञातीपत्रके व समाजप्रबोधन, कौटुंबिक जबाबदारी व महिलांचे सामाजिक योगदान, महिलांचा राजकारणातील सहभाग, वधु-वर मेळाव्यातील आजची वास्तविकता, कवीसंमेलन आदी परिसंवाद होणार आहेत. याचवेळी दुपारी दुपारी ३ वाजता दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्य संमेलनाध्यक्ष कृष्णी वाळके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. साहित्य, नाट्य, ग्रंथ हंडी व कार्यकर्ता गौरव रविवारी २२ डिसेंबर रोजी संत साहित्य, प्रेरणादायी आत्मचरित्र, पत्रकारिता आणि साहित्य, नाट्य व साहित्य, ग्रंथ हंडी आदींवर मान्यवर लेखक, साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी दैवज्ञ साहित्य मंच पदाधिकारी, यजमान संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार असून दुपारी तीन वाजता या चार दिवसीय अधिवेशनाचा  समारोप होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विजय कारेकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी दिली.

ठाण्यात रंगणार ४७ वे एकदिवसीय महानगर साहित्य संमेलन

ठाणे: तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि एक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरवणाऱ्या ठाणे शहरात या वर्षाला निरोप देताना महानगरसाहित्य संमेलन साजरे होणार आहे. महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल.भावे यांनी…

ठाण्यात फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी रस्त्यांचे होणार सर्वेक्षण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच फेरिवाला…