Month: December 2024

उपोषण होणार म्हणजे होणारच!- मनोज जरांगे

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत होते म्हणून आम्ही त्यांचा विरोध केला. सत्तेत…

फडणवीस ! फडणवीस !! फडणवीस!!!

महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदासाठी आज शपथविधी !   मुंबई – फडणवीस ! फडणवीस !! फडणवीस!!! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहे. यापुर्वी केवळ शरद पवार यांनाच तिनदा मुख्यमंत्री होता आले आहे. अनेक विक्रम मोडीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी…

प्रदूषण रोखण्यासाठी बेकऱ्यांवर होणार कारवाई

 महापालिका नोटीस बजावणार मुंबई-  वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आता बेकऱ्यांवरील कारवाईकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील सर्व बेकऱ्यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यात इंधन म्हणून लाकडाचा वापर करून प्रदूषण पसरवणाऱ्या बेकायदेशीर बेकऱ्यांना पालिका नोटीस बजावणार आहे. तसेच, बेकऱ्या बंद करण्याबाबत कायदेशीर तरतूद करण्यासाठीही एमपीसीबीसी चर्चा करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मुंबईत विविध ठिकाणी अनधिकृतपणे बेकऱ्या उभ्या राहिल्या आहेत. मुंबईत १,२०० बेकऱ्या आहेत. त्यामध्ये सुमारे निम्म्या बेकऱ्या बेकायदेशीर आहेत. मुंबई महापालिकेने २००७ सालापासून इलेक्ट्रिक वापराच्या अटीवर सुमारे ३५० बेकऱ्यांना परवानग्या दिल्या आहेत. असे असताना निम्म्या  बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. लाकडाच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईतील सर्व बेकऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर होत असल्याने प्रदूषण वाढते. त्यामुळे लाकडाऐवजी स्वच्छ इंधनाचा वापर करणे आवश्यक आहे. लाकडाचा वापर केल्याने हानिकारक प्रदूषकांचे उत्सर्जन होते. यामध्ये पार्टिक्यूलेट मॅटर, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउंड्स यांसारख्या प्रदूषक उत्सर्जनामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे नियम न पाळणाऱ्यांवर सात ते आठ बांधकामांच्या ठिकाणी पालिकेने कारवाईही केली आहे. ही कारवाई सुरू असतानाच आता पालिका मुंबईतील सर्व बेकऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याचे सांगण्यात आले. लाकडाच्या वापरामुळे आजार बेकरींमधील उत्सर्जन हे पीएम १० आणि पीएम २.५ यांचे प्राथमिक स्रोत आहे. ज्यांचे सूक्ष्म कण फुप्फुसांमध्ये अगदी आतापर्यंत पोहोचत असल्यामुळे श्वसनाच्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. भंगार लाकूड जाळल्याने तयार होणारे व्हिओसीज हे कर्करोग, अस्थमा आणि इतर अनेक आजारांसाठी कारणीभूत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

– महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वे सज्ज

 दादर रेल्वे स्थानकामध्ये मर्यादित प्रवेश मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी लाखो अनुयायी चैत्यभूमीला भेट देण्यासाठी मुंबईत येणार असल्याने मध्य रेल्वेने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. गर्दीमुळे गैरसोय होऊ नये, यासाठी ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान १६ विशेष मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि ५-६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाने ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ६ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दादर स्थानकात मर्यादित प्रवेश लागू केला आहे. मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांची गर्दी सुरळीत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. या वेळी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ आणि जीआरपी यांच्याद्वारे २४ तास हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे अतिरिक्त यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत. हेल्प डेस्क आणि तिकीट काउंटर दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कल्याण येथे २४ तास चालणारे हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. अनारक्षित तिकिटांसाठी आणि चौकशीसाठी चैत्यभूमीजवळ दोन यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत. गर्दी व्यवस्थापन दादर येथे स्वतंत्र प्रवेश व निर्गमन व्यवस्था तसेच मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. ‘चैत्यभूमीकडे जाण्याचा मार्ग’ आणि ‘राजगृहाकडे जाण्याचा मार्ग’ असे २१४ बॅनर दादर स्थानकावर लावण्यात आले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा गर्दी व्यवस्थापनासाठी ६७५ तिकीट तपासणी कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर रेल्वे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आरपीएफचे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करतील, तर दादर येथे २५० हून अधिक जीआरपी कर्मचारी तैनात असतील.  दादर येथे १२०, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४० आणि कल्याण येथे ३० कर्मचारी नियमित तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून दादर येथे २५० हून अधिक जीआरपी आणि ८० हून अधिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तैनात करण्यात आले आहेत. भोजनाची व्यवस्था प्रवाशांसाठी पुरेशी भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानक पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा पूल  – मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा मध्यभागी स्थित मोठा पूल व फलाट क्रमांक १२ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येणाऱ्या अनुयायी व प्रवाशांकरिता बंद असेल.  – रेल्वे प्रवाशांना स्थानकाबाहेर जाण्यासाठी आणि मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्याकरिता खुला राहील. 000

रविवार ८ डिसेंबर रोजी `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा साजरा होणार

 एकविरा देवी उत्सवाला सीकेपी बांधवांचा भरभरुन प्रतिसाद ठाणे : गेली काही वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला एकविरा गडावरील `एक दिवस कायस्थांचा’ उत्सव रविवार दि. ८ डिसेंबर रोजी होणार आहे. या उत्सवासाठी राज्य व देशातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गेली ८/९ वर्षे `एक दिवस कायस्थांचा’ एकविरा गडावर साजरा केला जातो. दरवर्षी उत्सवाची चढती कमान असते. यावर्षीही एक दिवस कायस्थांच्या सोहळ्यात विविध कार्यव्रâमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने एकविरा देवीचा होम करण्यात येणार असून या होमासाठी ज्ञातीतील जोडप्यांचा सहभाग असणार आहे. शिवाय महाआरती, पालखी, स्मरणिका प्रकाशन, भजन-किर्तन, भारुड इत्यांदी अनेक कार्यव्रâमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी होणारा कार्यव्रâम एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वप्नपूर्ती बंगला परिसरात करण्यात येणार आहे. कार्ला येथील एकविरा देवी प्रामुख्याने सीकेपी, आगरी, कोळी व दैवज्ञ सोनार समाजाची म्हणून ओळखली जाते. नवसाला पावणारी देवी अशी श्रध्दा या समाजाची आहे. पूर्वी म्हणजे १८व्या शतकात एकविरा गडावर सीकेपी समाजाची धर्मशाळा होती. तसेच समाजातील मंडळींचा मोठा राबता होता. परंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडले म्हणूनच सीकेपी संस्थेने `एक दिवस कायस्थांचा’ हा अभिनव कार्यव्रâम सुरु केला आणि देशभरातील सीकेपी बांधवांनी या कार्यव्रâमाला उत्स्फूर्त पाठींबा दिला. यावर्षी म्हणजे ८ डिसेंबर रोजी होणार्‍या कार्यव्रâमास ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीचा कार्यव्रâम सीकेपी समाजातील चार संस्था एकत्र येवून करीत आहेत. सीकेपी संस्था, कायस्थ प्रभू उत्कर्ष संस्था, पुणे सीकेपी फॅमेली ट्रस्ट, धर्मवीर आनंद दिघे विचार मंच इत्यांदीं संस्थांचा पुढाकार आहे. `एक दिवस कायस्थांच्या कार्यव्रâमाला कायमस्वरुपी भव्य स्वरुप यावे म्हणून देवीच्या नावाने विश्वस्त संस्था स्थापन करुन आगामी वर्षापासून उत्सव सोहळा होणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सीकेपी ज्ञातीतील विविध संस्थांतर्पेâ विकास देशमुख, स्वप्निल प्रधान, मिलिंद मथुरे, जयदिप कोरडे, निलेश गुप्ते, तुषार राजे इत्यांदींनी केले आहे.

पुण्यातून ओरोसला परतणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या एसटीला नांदगाव येथे अपघात

– सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नाही : काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती कणकवली :पुणे येथून ओरोस येथे परतणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या एसटीचा नांदगाव ओटव फाटा पूल येथे अपघात झाला. बुधवारी भल्या पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बस महामार्गावरील दुभाजकाच्या कठड्याला आदळली. सुदैवाने या अपघातात काही  विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेचे विद्यार्थी शैक्षणिक सहल आटपून परतत होते. शैक्षणिक सहलीच्या एकूण तीन बसेस होत्या. यातील एक बस नांदगाव ओटव फाटा येथील पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेत मदतकार्य केले.पोलीस पाटील वृषाली मोरजकर,भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर दिक्षा मोरजकर आदींनी मदतकार्य केले. पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी पोलिसांना कळविले. अपघातातील किरकोळ जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने , महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

बँक ऑफ महाराष्ट्र मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ग्राहकांना हिंदीत बोलण्याची सक्ती ? 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँक प्रशासनाकडे केली कारवाईची मागणी उल्हासनगर : येथील उल्हासनगर -४ मधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वर्तन करून हिंदी भाषेत बोलण्याची सक्ती केल्याचा…

उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा “आदर्श शाळा” म्हणून विकसित होत आहेत.

उल्हासनगर : महात्मा ज्योतिबा फुले मनपा शाळा क्रमांक 17, गोपाळ नगर सी ब्लॉक शहाड स्टेशन रोड या शाळेचे बांधकाम सुरू असून याव्यतिरिक्त  शअण्णा भाऊ साठे मनपा शाळा क्रमांक 24 (मराठी माध्यम)…

मुंबईच्या करमरकर दाम्पत्याने जिंकली प्राइम मिश्र जोडी ब्रिज स्पर्धा

Photo-6 मुंबई: प्राईम सिक्युरिटीज प्रायोजित प्राइम-ब्रिज स्पर्धेत ( 2024) मुंबईच्या मरियाना आणि संदीप या करमरकर दांपत्याने मिश्र जोडी प्रकाराचे जेतेपद पटकावले. बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत संदीप आणि मरियाना या पती-पत्नीने सर्वाधिक 1431 गुणांसह बाजी मारली. मुंबईस्थित हिमानी आणि राजीव खंडेलवाल जोडीने 1388 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. अहमदाबादच्या नीना शाह आणि कौस्तुभ देवधर जोडीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुख्य फेरीसाठी पात्रता न ठरलेल्या स्पर्धकांसाठीच्या स्ट्रॅटा जोडी स्पर्धेत दीपिका मेहता आणि रवी कौल विजेते तर अलका क्षीरसागर आणि इव्हान अल्फोन्सो उपविजेते ठरले. 0000

राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा – २०२४

चिन्मय केवलरमानी, प्रणिता सोमन महाराष्ट्र संघाचे कर्णधार   पुणे, दि. ५ डिसेंबर – पुरी, ओडिसा येथे ७ ते १0 डिसेंबर २०२४ दरम्यान २९वी सिनीअर, ज्युनिअर आणि सब ज्युनीअर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या महराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी पुरुषांमध्ये पुण्याचा राष्ट्रीय पदक विजेता सायकलपट्टू चिन्मय केवलरमानी आणि महिलांमध्ये अहिल्यानगरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती सायकलपट्टू प्रणिता सोमन यांची निवड करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच सुदाम रोकडे यांच्या अध्यक्षतेखालील सी एफ आय चे उपाध्यक्ष प्रताप जाधव, कॅमचे सचिव प्रा. संजय साठे, धरमेंदर लांबा आणि शिवछत्रपती पारितोषिक सन्मानित मीनाक्षी चौधरी – शिंदे यांच्या समितीने महाराष्ट्राचा २३ पुरुष १९ महिला असा एकूण ४२ सायकलपट्टूंचा संघ निवडला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीमती दिपाली पाटील यांनी निमंत्रक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे: पुरुष: मेन ईलीट: चिन्मय केवलरमानी (कर्णधार), सूर्या थात्तू सुदर्शन देवर्डेकर, श्रीकांत खडतरे (सर्व पुणे), सिध्देश पाटील (कोल्हापूर), यश थोरात (मुंबई),  महिला – वुमेन ईलीट: प्रणिता सोमन (कर्णधार), अपूर्वा गोरे (दोघी  अहिल्यानगर), ऋतिका गायकवाड (नासिक),मनाली रत्नोजी (पुणे), योगेश्वरी कदम (सांगली), पुरुष: मेन अंडर २३ –  मुस्तफा पत्रावाला, विवान सप्रु (दोघे मुंबई), वीरेंद्रसिंह पाटील (क्रीडा प्रबोधिनी पुणे),  अमन तांबोळी (सांगली) ज्युनिअर बॉईज: निहाल नदाफ (सांगली),  विपलव  मालपुते (पुणे), समर्जित थोरबोले, हरीश डोंबाळे (दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे), वुमेन ज्युनिअर: जुई नारकर (मुंबई) ,आकांक्षा म्हेत्रे (जळगाव) स्नेहल माळी (रायगड), सिद्धी शिर्के(पुणे), आसावरी राजमाने (क्रीडा प्रबोधिनी पुणे), बॉईज सब ज्युनिअर: मोक्ष सोनवणे(नासिक), राज कारंडे (अहिल्यानगर),  ओंकार गांधले, श्रीनिवास जाधव (दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे), गर्ल्स सब ज्युनिअर: श्रावणी परीट (पुणे), निम शुक्ला (मुंबई),आभा सोमन (पुणे), प्राजक्ता सूर्यवंशी (सांगली), युथ बॉईज दानिश जमादार, संस्कार घोरपडे (दोघे सांगली), अर्नव गौंड, अनुज गौंड (दोघे पुणे), युथ गर्ल्स् : गायत्री तांबवेकर (पुणे), राजनंदिनी सोमवंशी (क्रीडा प्रबोधिनी पुणे), अर्णवी सावंत (कोरेगोव-सातारा), प्रचिती खताळ (पुणे) महिला प्रशिक्षक / व्यवस्थापक: श्रीमती  दिपाली शिलदणकर प्रक्षिक: दर्शन बारगुजे व्यवस्थापक / मेकॅनिक :स्वप्निल माने 0000