Month: December 2024

उल्हासनगरमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या टेलरला नागरिकांकडून चोप

उल्हासनगर  – जीन्स पॅन्टचे अल्टरेशन करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी संतप्त जमावाने टेलरला भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी टेलरवर विनयभंगाचा तर ५ नागरिकांवर टेलरला मारहाण केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात…

ठाण्याचे देशस्थ ॠग्वेदी  कार्यालय नियमित सुरु

ठाणे : देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण संस्था, ठाणे यांचे कार्यालय आता सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळात संस्थेच्या सर्व सभासदांसाठी दररोज सुरु झाले आहे. कार्यालयात टीव्ही, इंटरनेट, कॅरम बोर्ड, बुद्धिबळपट यांचीही…

6 जानेवारी रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

नवी मुंबई : महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन हा 06…

६ डिसेंबर पासून मुंबई येथे राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ( मुंबई केंद्र २ )  मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, चर्नीरोड, मुंबई येथे सुरू होत…

 शार्वी सावेची अष्टपैलू खेळी व्यर्थ

 अर्जुन मढवी महिला क्रिकेट स्पर्धा ठाणे : तीन बळीसह अर्ध शतकी खेळी करणाऱ्या शार्वी सावेचा अष्टपैलू खेळ पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा पराभव टाळू शकला नाही. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित ४० षटकांच्या एकदिवसीय अर्जुन मढवी महिला क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने डहाणू पालघर तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा ४३ धावांनी पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या २२८ धावांचा पाठलाग करताना पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनला ९ बाद १८५ धावा करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना अनुभवी पूनम राऊतने संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. पूनमने नऊ चौकारासह ७५ चेंडूत ७८ धावा बनवल्या. अनिशा शेट्टीने ३० आणि सारा सामंतने २८ धावांची खेळी केली. ययाती गावडने चार आणि शार्वी सावेने तीन फलंदाज  बाद केले. या आव्हानाला सामोरे जाताना शार्वीने ६७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकारासह ८१ धावांची खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण ती बाद झाल्यावर मात्र स्नेहलता धनगड आणि लिली दिपचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. स्नेहलता आणि लिलीने प्रत्येकी २६ धावांची खेळी केली. अदिती सुर्वे, सिद्धी पवार आणि क्रितिका क्रिष्णकुमारने प्रत्येकी दोन बळी मिळवले. संक्षिप्त धावफलक : दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन : ४० षटकात ९ बाद २२८(पूनम राऊत ७८, अनिशा शेट्टी ३०, सारा सामंत २८, ययाती गावड ८-५०-४, शार्वी सावे ८-३४-३, शुभ्रा राऊत ८-३०-१) विजयी विरुद्ध पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन : ४० षटकात ९ बाद १८५ ( शार्वी सावे ८१, स्नेहलता धनगड २६, लिपी दिप २६, अदिती सुर्वे ८-१-२२-२, सिद्धी पवार ७-०-३१-२, क्रितिका क्रिष्णकुमार ८-१-४३-२) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : पूनम राऊत

ठाणे  केंद्रावरील राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात –  बिभीषण चवरे

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे सुरू होत आहे. दिनांक ५ डिसेंबर ते १३ जानेवारी या दरम्यान या स्पर्धा होतील. या स्पर्धेत सकाळी ११.३० वा. व  संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण २४ संघांचा सहभाग आहे. ठाणे शहरासह रायगड जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.  राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी नाममात्र रु- १५/- व १०/- तिकीट ठेवण्यात आलेलं आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात न्यायबंदीला मारहाण

कल्याण – येथील आधारवाडी तुरुंगातील एका न्यायबंदीला इतर सात न्यायबंदींनी मंगळवारी सकाळी दगड आणि बादलीच्या साहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत एका न्यायबंदीच्या डोळे, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एका…

ठाण्यात गावठी हात बाॅम्बचा साठा जप्त

ठाणे : ठाणे शहरात गावठी हात बाॅम्बचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रायगड येथील माणगाव भागातील एका तरूणाला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्याकडून १० हात बाॅम्ब जप्त केले…

शासनाकडून मानधन घेणाऱ्या वृध्द साहित्यिक, कलावंतांनी आधारकार्ड अपडेट करावे – रोहन घुगे

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. १९५४-५५ या वर्षापासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या…

गोदी कामगार वेतन करार अंमलबजावणीसाठी आज निदर्शने – सुधाकर अपराज

अनिल ठाणेकर ठाणे : गोदी कामगार वेतन करार अंमलबजावणीसाठी, मुंबई पोर्ट प्राधिकरणातील सर्व कामगार संघटना व  लोकाधिकार समिती आणि  मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन यांच्या सहभागाने गुरुवारी ५ डिसेंबरला दुपारी १२.०० वाजता आंबेडकर भवन समोर निदर्शने होणार आहेत. या आंदोलनात गोदी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स  )  जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी केले आहे. भारतातील प्रमुख बंदरातील सहा महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या  २३ नोव्हेंबर २०२४ रोजी गोवा येथे झालेल्या मिटिंगमधील  निर्णयानुसार  २८ नोव्हेंबर  रोजी प्रत्येक बंदरात वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित  करा,  असे पत्र सर्व बंदरातील कामगार संघटनांनी अध्यक्षांना दिले आहे. पी. डिमेलो भवन येथे  २ डिसेंबरला झालेल्या मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी, सुधाकर अपराज व त्यांचे पदाधिकारी, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस, केेरसी पारेख व त्यांचे पदाधिकारी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, मिलिंद घनकुटकर, प्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे उदय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन व मुंबई पोर्ट ट्रस्ट  एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनचे सुधीर मकासरे, मुंबई पोर्ट्र ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे बाबाजी चिपळूणकर व त्यांचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत  ५ डिसेंबर रोजी सेवेतील कामगारांचा राष्ट्रीय निषेध दिन व १० डिसेंबर रोजी सेवानिवृत्त कामगार व कुटुंबीय यांचा राष्ट्रीय निषेध दिन आणि गरज भासल्यास १७ डिसेंबर रोजी किंवा नंतर बेमुदत संप  करण्याचे सर्वानुमते ठरले आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली आहे. 0000