Month: December 2024

ईव्हीएमविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपतींना पाठवली १० हजार पोस्टकार्ड

१- बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची केली विनंती ! ईव्हीएममधील मतदानामध्ये तफावत, मशीनमध्ये छेडछाड, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय – डॉ.जितेंद्र आव्हाड अनिल ठाणेकर ठाणे : ईव्हीएम हटाओ-लोकशाही बचाओ, असा नारा देत विधिमंडळ गटनेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची सुमारे १० हजार पोस्टकार्ड पाठविली असून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची विनंती करण्यात आली आहे. गेल्या काही निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतदान यामध्ये तफावत असल्याचीही काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, विधानमंडळ गटनेते, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.  या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी स्वाक्षरी मोहिमेसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी मिलिंद साळवी, अपर्णा साळवी, रचना वैद्य, राजेश साटम, राजेश कदम, मिलिंद बनकर, राजु चापले, गजानन चौधरी, जतिन कोठारे, दिलीप नाईक, माधुरी सोनार, कैलास हावळे, ज्योती निंबर्गी, सुनीता मोकाशी, सुनील कुऱ्हाडे , अजित मोरे, आशिष खाडे, शेखर भालेराव, संजीव दत्ता, संदीप ढकोलिया, विक्रम सिंह, मकसुद खान, जग्गत सिंग, प्रदीप साटम आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ईव्हीएमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे. त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा”, अशा आशयाचा मजकूर या पोस्टकार्डवर लिहिण्यात आला होता. ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीमध्ये डॉ.जितेंद्र आव्हाड यांनीच टाकली. डॉ.जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, इव्हीएम हॅक केले असा आमचा आरोप नाही. मात्र, इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली, असे आमचे मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. १७ सी चा फाॅर्म आणि झालेले मतदान यांची आकडेवारी जर जुळत नसेल तर नक्कीच काही तरी घोटाळा आहे. पाच वाजता ५२ % मतदान होते. नंतर ते ६५-६८ % टक्के झाले. ही आकडेवारी कशी वाढली? एकदम १३ % वाढ म्हणजे झालेल्या मतदानाच्या एक चतुर्थांश मतदान अवघ्या तासाभरात होऊ शकते का? ही वाढ कुठून झाली?  यावर निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही. टाकलेली मते आणि मोजलेली मते यामध्ये यामध्ये फरक येतोय. इव्हीएममध्ये जर संगणकप्रणाली वापरली जात असेल तर मतदानाची टक्केवारी काढण्यासाठी असे कुठले मोठे राॅकेट सायन्स आणावे लागतेय. हा सगळा कुणाच्या तरी आदेशावरून झालेला घोळ आहे. त्यामुळेच आता जनआंदोलन सबंध भारतभर उभे राहिल. कारण, जर असेच घडत राहिले तर या देशाची लोकशाही संपुष्टात येईल. म्हणूनच आम्ही राष्ट्रपतींना हजारो नागरिकांची पत्रे पाठविली असून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची विनंती केली आहे. जर अमेरिकेतील मतमोजणी अडीच दिवस चालत असेल तर आपल्याकडे काय अडचण आहे. लोकशाहीत मतदान प्रक्रिया ही पारदर्शी असली पाहिजे. मी टाकलेले मत कुठे गेले आहे, हे.मला कळलेच पाहिजे. त्यासाठीच आम्ही आता राष्ट्रपतींना विनंती केली आहे, असे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 0000

 देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने भाजपाचा ठाण्यात आनंदोत्सव

 महाराष्ट्राची प्रगती कायम राहील : संजय वाघुले   ठाणे : भाजपाच्या विधीमंडळ पक्ष गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर भाजपाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्षकार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे वृत्त धडकताच, भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटत महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विकासात २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले होते. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची उद्यापासून मुख्यमंत्रीपदी निवड होत आहे, हा समस्त महाराष्ट्रासाठी व भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. प्रगतीपथावर असलेला महाराष्ट्र आता भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला. तसेच लाडकी बहीण योजनेतील बहिणींना आणखी आर्थिक बळ मिळेल, असे संजय वाघुले यांनी सांगितले. 00000

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राव्दारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून 03 डिसेंबर म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनाचे…

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

माथेरान मध्ये दिव्यांग दिन उत्साहात साजरा

माथेरान : माथेरान मध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दिव्यांग दिनानिमित्त माथेरान नगर परिषदेतर्फे  दिनांक बांधवांना आर्थिक सहाय्य वाटप बुधवारी कम्युनिटी सेंटर येथे सायंकाळी ०४-०० वाजता कार्यक्षम मुख्याधिकारी…

लक्ष्मीदास बोरकर जन्मशताब्दी सोहळा पुढे ढकलला

मुंबई : स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि वृत्तपत्रीय कारकीर्दीचा झळाळता आलेख असलेले दिवंगत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीदास बोरकर यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त लक्ष्मीदास बोरकर जन्मशताब्दी समारोह समिती आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या…

४२वी आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धा

झुनझुनवाला व एस. एस. टी. महाविद्यालयाला विजेतेपद मुंबई : महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४२ वी आंतर महाविद्यालयीन खो-खो (मुले व मूली) स्पर्धा मनोरंजन मैदान, पेरू कंपाउंड, लालबाग येथे पार पडली. या…

माझी वसुंधरा अभियानची अंमलबजावणी कोकण विभागात अधिक प्रभावीपणे करावी

कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांचे प्रतिपादन ठाणे : पर्यावरणातील बदल लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान ५.० हा कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा, प्रत्येक यंत्रणेने या अभियानात सक्रिय व्हावे,…

दैनंदिन बाजार धूळखात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली कोपरखैरणेतील बाजार इमारत वापराविना

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर सहा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या दैनंदिन बाजाराची इमारत वापराविना पडून आहे. बाजाराचे उद्घाटन न झाल्याने हा बाजार धूळखात पडून आहे. मात्र काही…