Month: December 2024

डोंबिवलीत रिजन्सी, गोळवली, दावडीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानीने भाडेवाढ

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून रिजन्सी गृहसंकुल, दावडी, गोळवली, सोनारपाडा दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकांना गेल्या काही दिवसांपासून अचानक पाच ते दहा रूपयांची वाढ केली आहे. रिक्षा संघटना, उपप्रादेशिक परिवहन…

भालचंद्र पाटील यांना आगरी समाजभूषण प्रदान

कल्याण : मुंबईत १९३५ साली स्थापन झालेल्या आगरी समाज संघ यांच्या विद्यमाने समाज मोहोत्सव साजरा करण्यात आला. त्या समयी समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्यकरणाऱ्या अनेक बांधवांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये…

‘जेबीएसपी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली…

कल्याण परिमंडळ 3 मध्ये नशेखोरांविरोधात कारवाई सुरूच

 रविवारी 108 नशेखोरांवर आणि 92 मोटारसायकलस्वारांवर कारवाई  कल्याण : अल्पवयीन मुलीची हत्या आणि इतर वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर कल्याणचे पोलिस उपायुक्त अतूल झेंडे यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आणल्याचे दिसत आहे. कल्याणच्या विविध भागांमधील नशेखोरांना ताब्यात घेत डीसीपी अतुल झेंडे यांनी चांगलाच इंगा दाखवला. पोलीसी खाक्या दाखवण्यासह अनेक नशेखोरांना उठाबशा काढायला लावल्या आणि पोलीसांनी त्यांची वरातही काढल्याचे दिसून आले. पोलीस उपायुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा प्रकारची कारवाई सतत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. कल्याण परिमंडळ 3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी, निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरू असून रविवारी रात्री या ठिकाणी एकुण 108 नशेखोरांविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच रोडवरील अती वेगाने मोटार सायकल चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा एकूण 92 कारवाई कल्याणमध्ये पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. पोलिसांची धडक कारवाई मोहिम अशीच सुरू राहणार  असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाई सत्रामुळे नशेखोरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

ठाण्याच्या अतिरिक्त पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली..

 आमदार संजय केळकर यांची दोन्ही महापालिका अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक अनिल ठाणेकर मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी आदी भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यादृष्टीने आमदार संजय केळकर यांनी  अधिवेशनात अनेकवेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सोमवारी केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर  मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता (प्रचालने) पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार, श्री.कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित ५० एमएलडी पाण्यापैकी २५ एमएलडी पाणी आधी तातडीने मिळावे याबाबत श्र.केळकर यांनी आग्रह धरला. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या आधी ठाणे महापलिकेचे आयुक्त म्हणून काम केले असल्याने त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहिती आहे. त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीने अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे वरळी येथे पाणी पुरवठा विभागाचे नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ठाण्याला तातडीने २५ एमएलडी पाणी निश्चित मिळेल, असा विश्वास केळकर यांनी सांगितले.

ठाण्यात शिव, फुले, शाहू, आंबेडकरी अनुयायांचा एल्गार

 सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा ! अनिल ठाणेकर ठाणे : सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे, या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित, पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी, हे आजचे आंदोलन सुरूवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल,  असा इशारा दिला. परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती. त्यानिषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी, “आंबेडकर ही फॅशन झाली आहे,” असे विधान केले होते. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शहरातील ७२  बुद्धविहारांशी संबधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांगदेखील सहभागी झाले होते. यावेळेस मोर्चेकऱ्यांकडून छत्रपती शिवाजीमहाराज की जय, राष्ट्रपिता जोतिराव फुले यांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराज यांचा विजय असो,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो , झिंदाबाद,  झिंदाबाद संविधान झिंदाबाद , जब तक सुरज चाँद रहेगा… बाबा तेरा नाम रहेगा,  सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे,  राजीनामा द्या.. अमित शहा राजीनामा द्या, हर जोर जुल्म की टक्कर मे, संघर्ष हमारा नारा है , जय जय जय जय भीम, जय भीम, जय भीम अशा घोषणा दिल्या. या मोर्चात  ठामपा मा. स्थायी समिती सभापती भय्यासाहेब इंदिसे, मा. परिवहन समिती सभापती जितेंद्रकुमार इंदिसे,  राजाभाऊ चव्हाण,  सुनील खांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर,  पंढरीनाथ गायकवाड,  गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोभसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब येडेकर, डॉ.प्रमोद जाधव, प्रमोद इंगळे, सुरेश कांबळे, अशोक कांबळे, प्रमोद इंगळे, विनोद भालेराव, तात्याराव झेंडे,  विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, दैवशाळा हराळे आदींसह हजारो शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते. या प्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की,  अमित शहा यांनी केलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. तर, सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई झाली तरच भीमसैनिकांचा राग कमी होईल, असे सांगितले सोमनाथ सुर्यवंशी हत्याप्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांन बडतर्फ करून आयपीसी 302 तथा बीएसएस 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून  त्यांना अटक करावी, त्याच्या कुटुंबियांना एक कोटीचे अर्थसाहाय्य  आणि शासकीय नोकरी द्यावी;  तसेच, अमीत शहा लोकसभेत द्वेषातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केले आहे. मात्र, अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा बोरिवलीच्या विद्यार्थ्यांनी  श्रमदानातून बांधला वनराई  बंधारा

राजीव चंदने मुरबाड :‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ श्रमदानातून कुठली गोष्ट अशक्य नाही, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना धडा देणारे जिल्हा परिषद शाळा कन्होल बोरिवलीचे शिक्षक नितीन राणे सर यांनी आपल्या…

ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ

 – ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सोयगाव : सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला असून  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी समाजसेवक मुश्ताक शेख यांनी केली आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारीची नियमित साफसफाई केली जात नसल्याने  काही ठिकाणी गटारी जाम झाल्यामुळे तुडुंब भरल्या आहे.तर काही ठिकाणी गटारी नागरिकांनी बुजून टाकल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत असते.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गटारीतील सांड पाण्याचे काही ठिकाणी डबके साचल्याने गावात दुर्गंधी पसरली असून  डासांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतच्या हलगर्जी पणामुळे गावात स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला आहे. डासांच्या प्रदूर्भावाने लहान मुलांसह नागरिक, वयोवृद्ध व महिलांचे आरोग्य धोक्यात आले असून थंडीताप, डायरीया, मलेरिया व डेंगू  सारख्या साथीच्या रोगांच्या दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र ग्रामपंचायत अजूनही झोपेतच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. महिलांची कुचंबणा गावात महिला व पुरुषांसाठी एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने गावाच्या आजूबाजूला दुर्गधी पसरत आहे. ग्रामपंचायत कडून कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याने सोयगाव -चाळीसगाव राज्य महामार्ग क्रमांक २४ गावालगत रस्त्याच्या दुतरफा महिला शौच्यास उघड्यावर बसत असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. शाळेत पायी जाणाऱ्या विध्यार्थी व नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत असून आरोग्यावर परिणाम होत आहे. याच रस्त्यावरून लोकप्रतिनिधी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचा वापर असून कोणीही तसदी घेतली नाही यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन:

ठाणे : शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, त्याच सोबत ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. रविवारी दुपारी २ च्या सुमारास सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी…