मुरबाड शहराचा होतोय ‘उडता पंजाब’
राजीव चंदने मुरबाड : संपूर्ण मुरबाड शहरात व तालुक्यात छुपा पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू याबाबत तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलिस प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत…
राजीव चंदने मुरबाड : संपूर्ण मुरबाड शहरात व तालुक्यात छुपा पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू याबाबत तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलिस प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत…
गोध्रा रेल्वे हत्याकांडावरील सत्यघटनेवर आधारीत ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाहिला. यावेळी गृहमंतंरी अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
मुंबई : बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्कांऊटरप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभगाला (सीआयडी) चांगलेच झापलं. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने…
शिंदे ठाण्यात, अजित पवार दिल्लीत स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेत एतिहासिक विजय मिळवून १० दिवस उलटल्यानंतरही महायुती अजूनही सत्ता स्थापन करू शकलेले नाही. आधी मुख्यमंत्रीपदावरून आणि आता गृह खात्यावरून महायुतीत कलह…
मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) घर खरेदीदारांच्या विविध तक्रारींच्या निवारणासाठी 200.23 कोटी रुपये वसूल केले आहेत. मुंबई शहर, उपनगर, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड, पालघर, संभाजीनगर, नाशिक आणि चंद्रपूर यांसह विविध जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगर (76.33 कोटी…
अकोला : वंचित बहुजन आघाडीनेही आता इव्हीएमविरोधात राज्यभरात एल्गार पुकारला आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात…
सोलापूर: माळशिरसमधील मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज, सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी ईव्हिएमचा झोल उघड करण्यासाठी मतदानपत्रिकेवर प्रतिकात्मक मतदान मारकवाडीत घेतले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी…
रेल्वेमंत्र्यांचे विविध मागण्यांकडे वेधले लक्ष योगेश चांदेकर पालघरः दिवा-भिवंडी-अंबाडी-कुडूस-वाडा-विक्रमगड असा नवा लोहमार्ग टाकण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सरवा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या अन्य प्रश्नाकडेही त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात डॉ. सवरा पालघर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनास आणत आहेत. त्यासंबंधीची निवेदनेही ते देत आहेत. गेल्या दहा-वीस वर्षात दिवा-भिवंडी-अंबाडी- कुडूस- वाडा- विक्रमगड या भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्येची वाढती घनता लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढणे आवश्यक आहे. या भागात नवीन लोहमार्ग टाकला, तर प्रवाशांना मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शन पर्यंत जाणे शक्य होईल. तसेच थेट कोकणात जाण्याचा मार्ग सुलभ होईल. याशिवाय भिवंडी-वाडा हे लोहमार्गाच्या नकाशावर येऊ शकतील, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे. लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना थांबा द्या याबाबत खा. सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले आहे. वसई येथे मेगा टर्मिनल सुरू करण्याबाबत वैष्णव यांनी दिलेला आश्वासनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वे मंडळाच्या बैठकीत कच्छ एक्सप्रेस, दादर बिकानेर एक्सप्रेस, बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस आणि बांद्रा गाजीपूर एक्सप्रेस या लांब पल्यांच्या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून याठिकाणी देशभरातील कामगार वेगवेगळ्या उद्योगात काम करतात; परंतु त्यांना दक्षिण आणि उत्तर भारतात जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यांना मुंबई किंवा सुरतला गाड्या पकडण्यासाठी जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालघर या जिल्हास्तराचा विचार करून रेल्वे मंडळाला पालघर येथे या चार लांब पडलेल्या गाड्यांना थांबा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी वैष्णव यांच्याकडे केली आहे. मेमो गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वेची आरक्षित जागा नालासोपारामधील निलमोरे या गावात आहे तलावाच्या आकाराची ही जागा बाग आणि क्रीडांगणासाठी महापालिकेने आरक्षित केले आहे. या जागेवर खर्च करण्यासाठी रेल्वेने ही जागा वसई विरार महापालिकेकडे द्यावी आणि त्यापैकी दहा हजार चौरस फुटाची जागा कमी होण्यासाठी द्यावी, अशी मागणी खा. सवरा यांनी वैष्णव यांच्याकडे केली. मेमो गाड्या घोलवडपर्यंत आणण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय बलसाड फास्ट पॅसेंजरपूर्वी सकाळी ११ ते दुपारी दोन आणि सायंकाळी साडेचार ते रात्री आठपर्यंत मेमो गाड्या सुरू कराव्यात, सुरतसाठी सकाळी नऊ ते दुपारी बारा दरम्यान आणि सायंकाळी चार ते संध्याकाळी सात दरम्यान पॅसेंजर अगोदर मेमो सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. उपनगरीय सेवा वापीपर्यंत वाढवा मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सध्या डहाणूपर्यंत आहे. ती घोलवड किंवा उंबरगाव, वापी पर्यंत वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही सेवा वाढवली, तर त्याचा फायदा विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होईल असे खासदार सवरा यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मागच्याच सरकारवर लोकांनी विश्वास दाखवला. प्रचंड बहुमत देऊनही दोन्ही ठिकाणी मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ प्रमुख पक्षांवर आली. सरकार स्थापन करण्याला प्राधान्य देण्याऐवजी राजकीय आजार बळावण्याने एकीकडे सरकार…
पुणे : कॅप्टन साहिल कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली, MG स्पोर्ट्स क्लबने पुणे टुर्नामेंटमध्ये अपूर्व कामगिरी केली आणि उपविजेते म्हणून स्पर्धा संपवली, ज्यामध्ये त्यांच्या चिकाटी आणि कौशल्याचे दर्शन झाले. टुर्नामेंटमध्ये एक उत्तम कामगिरी करणारा खेळाडू होता शिवम ठोम्बरे, ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच्या अत्युत्तम ऑलराऊंड योगदानामुळे तो डोक्यावर ठरला. गोलंदाज म्हणून, शिवमच्या गोलंदाजीचे स्पेल्स महत्त्वपूर्ण क्षणांत निर्णायक ठरले, कारण त्याने सातत्याने ब्रेकथ्रू दिले जेव्हा टीमला त्यांची गरज होती. मैदानावर देखील त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय होते, एक शानदार कॅच घेतल्याने एका सामन्याचा कल बदलला आणि टीमला मोठा गती मिळवून दिला. शिवमचे दबावाच्या परिस्थितीत बॉल आणि क्षेत्ररक्षणात यशस्वी योगदान MGSC च्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. त्याच्या फलंदाजीतील योगदान देखील महत्त्वाचे होते, कारण त्याने टुर्नामेंटच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये मोलाचे धावा दिल्या. त्याच्या सर्वांगीण कौशल्यामुळे आणि खेळाकडे त्याच्या परिपक्व दृष्टिकोनामुळे तो MG स्पोर्ट्स क्लबसाठी एक अत्यंत प्रभावशाली खेळाडू ठरला आणि त्याला योग्य प्रमाणात मान्यता मिळाली. रौनित सिंग हा दुसरा प्रमुख खेळाडू होता, जो टीमचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उभा राहिला. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि तणावाच्या परिस्थितीत सामन्याचा भाग्य बदलण्याची क्षमता त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आली. रौनितने अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या, ज्यामुळे MGSC ला फायनलपर्यंत पोहोचायला मदत झाली, आणि त्याची फलंदाजी आणि शांतता त्याला टीमच्या फलंदाजीच्या रचनेतील कणा बनवून ठेवली. माझ खान देखील MGSC च्या फायनलपर्यंतच्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला. त्याची स्थिर फलंदाजी, विशेषतः महत्त्वपूर्ण क्षणांत, टीमला आवश्यक ती आधार देत होती, ज्यामुळे टीम महत्त्वाच्या टप्प्यांवर योग्य मार्गावर राहिली. टीमचे गोलंदाज, ज्यात रामलखन राजभर आणि निशांत पिल्लाई यांचा समावेश आहे, हे देखील महत्त्वपूर्ण होते, कारण त्यांनी महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेतल्या आणि विरोधकावर दबाव ठेवला. फायनलमध्ये, अनेक खेळाडूंनी, ज्यात विगनेश गवडे, शिवम शर्मा, अर्णव सापकाल, धैर्य अश्तेकर, वेदांत राजिवले, अनिकेत धावले, भाविक सोनी आणि अहमद खान यांचा समावेश आहे, मोठे योगदान दिले. MG स्पोर्ट्स क्लबचा फायनलपर्यंतचा प्रवास त्यांच्या सामूहिक कौशल्य आणि निर्धाराचे प्रतीक होता, आणि त्यांनी टुर्नामेंट गर्वाने आणि भविष्याच्या आशा भरण्यासह संपवला.