Month: December 2024

फडणवीसांची मुलुंडमध्ये ‘दिवाळी’

भाजापा नेते किरीट सोमय्या यांनी मुलुंडमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह संमेलनात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सहभागी झाले आणि त्यांना कॅमेरात टिपण्यासाठी उपस्थितांमध्ये अशी चढाओढ सुरु झाली.

संघ दक्ष ! फडणवीसच मुख्यमंत्री !

मुंबई : मागील सत्तासंघर्षात सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याएवेजी एनवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून घेण्यात आला…

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील…

 आगामी काळातील निवडणुकांमध्येही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे भाकित   ठाणे: लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंदूंमध्ये मतदानाबाबत उदासिनता होती. मात्र, बांगलादेश, सिलीगुडी आणि सिमला येथील हिंदूवरील अन्यायाच्या घटनांनंतर हिंदू अस्मिता जागी झाली. हिंदू धर्मियांना आपल्या उदासिनतेबाबत पश्चाताप झाल्यानंतर सुरुवातीला हरियाणा व आता महाराष्ट्रातील निकाल लागले. यापुढील निवडणुकांतही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी येथे व्यक्त केले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचे `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान पार पडले. त्यावेळी श्री. तोरसेकर बोलत होते. नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो ठाणेकरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्वाचे अभ्यासक अजय जगताप यांनी `लव्ह जिहाद’वर लिहिलेल्या `व्हायरस’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला २४० हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुपला नाही. पण तो हिंदूंना खुपला. त्यानंतर हळूहळू हिंदू धर्मीय संघटीत होत गेले, असे प्रतिपादन भाऊ तोरकसेकर यांनी केले. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपाने मेहनत केली नाही. तर महाविकास आघाडीने संपूर्णपणे ताकद लावली. त्यामुळे त्यावेळी भाजपाची हाराकिरी झाली होती. महायुती व महाविकास आघाडीच्या मतांमध्ये केवळ ०.०३ टक्क्यांचा म्हणजे दोन लाख मतांचा फरक होता. महाविकास आघाडीतील काही पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यांची मते महाविकास आघाडीकडे वळविण्यात आली. मात्र, ते विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास महाविकास आघाडीचा पराभव निश्चित होता. लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने भाजपाचा पराभव झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, ते ध्यानात घेतले गेले नाही, याकडे भाऊ तोरसेकर यांनी लक्ष वेधले. तसेच २०१९ पासून देवेंद्र फडणवीस यांची पाच वर्ष यथेच्छ टिंगल केली गेली. मात्र, त्यांनी संयम बाळगून आज इतर सर्वांना चेष्टेचा विषय केले आहे, असा टोला श्री. तोरसेकर यांनी मारला. सध्या सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे राजकारणाचा `चुथडा’ झाला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात अभ्यासू विरोधी आमदारांची फळी होती. परंतु, आता ती फळी संपल्यामुळे लोकशाहीपुढे आव्हान निर्माण झाले आहे, अशी खंत श्री. भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केली. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊ तोरसेकर यांचे संजय वाघुले व संस्थेच्या सदस्या वृषाली वाघुले यांच्याकडून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.

 विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’

 राज्यस्तरीय ११ व्या ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन पनवेल : दरवर्षी प्रमाणे यंदाही रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी “रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा” हे ब्रीदवाक्य घेऊन ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक केंद्रावर १३ डिसेंबर, जळगाव केंद्रावर १४ व १५ डिसेंबर, पुणे केंद्र १९ ते २२ डिसेंबर, रायगड (पनवेल) २५ डिसेंबर, तसेच मुंबई, ठाणे, कल्याण व इतर (पनवेल) केंद्राची प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबरपर्यंत होणार आहे.  तर अंतिम फेरी १० ते १२ जानेवारी २०२५ रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.  या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि  दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे.  या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास ०१ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक ७५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह,  तॄतीय क्रमांक ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी १० हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह तसेच इतरही वैयक्तिक प्रकारचे पारितोषिके देऊन कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा नाट्य संस्था कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्पर्धा प्रमुख व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. 0000

कल्याणमध्ये भास्कर ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळाडू निवड स्पर्धां

ठाणे  : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे युएन बारा भास्कर ट्रॉफीसाठी कल्याणमध्ये निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईमध्ये भास्कर ट्रॉफी सामने खेळवले जातात. या सामन्यांमध्ये प्रवेश घेणार्‍यांसाठी १-९-२०१२ किंवा त्यापुढे जन्म झालेले  क्रिकेटपट्टू सहभागी होऊ शकतात. कल्याणच्या यंग असोसिएशन आणि युनियन क्रिकेट अकादमीसाठी ही निवड होणार आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळात युनियन क्रिकेट अकॅडमी, पोद्दार इन्टरनॅशनल शाळेसमोर, वायले नगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथील मैदानावर ही निवड चाचणी होणार आहे. तरी कल्याण परिसरातील किंवा ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन युनियन क्रिकेट अकादमीचे तुषार सोमानी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२३८९०१८९ 00000

कामगार महर्षी आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा ७ डिसेंबरला

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ७ डिसेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित…

सरस्वती मंदिरला दुहेरी मुकुट

 आंतरशालेय खो-खो स्पर्धा   मुंबई : माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलतर्फे आयोजित अमृत महोत्सवी आंतरशालेय खो-खो स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू असून,  झालेल्या अंतिम सामन्यात चुरशीच्या खेळाचे प्रदर्शन झाले. या दोन्ही सामन्यात…

‘मुंबई स्पोर्ट्स २ रे ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’ आणि ‘मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार प्रदान

 ध्रुव सितवालाने मिळालेली एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम भारतीय सैन्याच्या विधवांसाठीच्या निधीसाठी देणगी म्हणून जाहीर केली   मुंबई- मुंबई स्पोर्ट्स नुकतेच “स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर” व “मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट” चे पारितोषिक वितरण केले. हे पुरस्कार प्रवीण शेट्टी – अध्यक्ष, बंट्स संघ, आर. के. शेट्टी प्र. कार्यवाह बंट्स संघ, प्रदीप गंधे, रविराज ईळवे (कामगार आयुक्त), जय कवळी, उदय देशपांडे, जया शेट्टी, भास्कर सावंत आदी खेळातील दिग्गजांकडून वितरीत करण्यात आले. बक्षीस वितरणानंतर खेळाडूंनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या त्या पुढील प्रमाणे. ध्रुव सितवाला : त्यांना मुंबई स्पोर्ट्सकडून “स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023-24” पुरस्कार प्रदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी जाहीर केले की या पुरस्काराची रक्कम रु. 1,00,000/- (रु. एक लाख) मुंबई स्पोर्ट्सतर्फे भारतीय सैन्याच्या विधवांसाठीच्या निधीसाठी देणगी म्हणून दिली जावी. त्यांच्या या कृतीने ते फक्त त्यांच्या खेळाचेच चॅम्पियन नाहीत, तर हृदयानेही चॅम्पियन आहेत हे दाखवून दिले. अश्वार्या मिश्रा : यांनी आपला संदेश वडील आणि भाऊ यांच्या माध्यमातून पाठवला, त्यांनी तिच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. त्यांनी भारतातील अॅथलेटिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी आदिले सुमारिवाला यांचे आभार मानले. तसेच “मुंबई स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023-24” पुरस्कारासाठी मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. अक्षन के. शेट्टी : यांचा पुरस्कार त्यांचे वडील श्री करुणाकर शेट्टी यांनी स्वीकारला, जे पोइसर जिमखान्याच्या यशस्वीतेमागील मुख्य व्यक्तिमत्त्व आहेत. अक्षन यांनी मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार म्हणजे घरच्यांनी आपल्या व्यक्तीला दिलेला सन्मान असल्याचे सांगितले. कुणाल कोठेकर : यांनी मुंबई स्पोर्ट्सने खेळाडूंना सन्मानित करण्याचा हा उत्कृष्ट उपक्रम असल्याचे सांगितले व सर्वांचे आभार मानले. रुतुजा खाडे : यांनी मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की मुंबईच्या खेळाडूसाठी हा पुरस्कार मिळणे हे अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. आमच्या कामगिरीची दखल मुंबईतील संपूर्ण खेळ जगात घेत आहे याचा अभिमान असल्याचे स्पष्ट केले. सोनाली बोराडे : यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. तसेच यामुळे तिचा हुरूप वाढल्याचे सांगितले आणि मुंबई स्पोर्ट्सचे आभार मानले. नताशा जोशी : पॅरा डेफ ऑलिम्पिक शूटर, यांनी सांगितले की मुंबई स्पोर्ट्स दरवर्षी खेळाडूंना पुरस्कार देऊन उत्तम कार्य करत आहे. मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेला सन्मान तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरेल आणि भविष्यातील मुंबईतील खेळाडूंना प्रेरणा देईल. मिलिंद वागळे : क्रिकेट समालोचक, यांनी मुंबई स्पोर्ट्सचे मनःपूर्वक आभार मानले आणि पद्मश्री उदय देशपांडे, त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून आनंद व्यक्त केला. भाग्यश्री सावंत : यांच्या आईने पुरस्कार स्वीकारला व अशा प्रकारे पहिल्यांदाच सन्मान झाल्याचे सांगितले. प्रदीप गांधे  :…

स्व. वसंतराव डावखरे स्मृती पुरस्कारासह कोकणातील शिक्षक, संस्थाचालकांचा सन्मान

 ठाण्यात रंगला पुरस्कार सोहळा   ठाणे : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. दरम्यान, पुढील वर्षापासून या पुरस्काराबरोबरच आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभाग आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी गटनेते मनोहर डुंबरे, कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, जनरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र रजपूत, समन्वय प्रतिष्ठानच्या संचालिका सौ. नीलिमा डावखरे, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, शेखर कुलकर्णी, एन. एम. भामरे, किशोर पाटील आदी उपस्थित होते. या वेळी ठाणे शहर मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या आमदार संजय केळकर यांचा सत्कार करण्यात आला. कोकणातील उत्कृष्ट संस्थाचालक म्हणून ठाणे येथील मावळी मंडळ, पालघर जिल्ह्यातील अरविंद स्मृती, मुरबाडमधील न्यू इंग्लिश स्कूल, नवी मुंबईतील शेतकरी शिक्षण संस्था, डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था, तारापूर एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्गातील कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कल्याण पूर्व येथील आदर्श शिक्षण मंडळ, भिवंडीतील पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ, कल्याण येथील नुतन शिक्षण संस्था यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर कोकणातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कोकणातील शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेत कायम अव्वल क्रमांक राखला. दहावीच्या परीक्षेत कोकणातील विद्यार्थ्यांचा राज्यात सर्वाधिक निकाल असून, त्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. पुढील पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचा आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडीकडून होणारा सन्मान हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न विधीमंडळात मांडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार केळकर यांनी दिली. विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्ठाचालकांचा सन्मान करताना आनंद होत आहे. भारताच्या भविष्यासाठी कार्यरत असलेल्या गुणवंत शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमाची परंपरा २०१८ पासून सुरू झाली. सुरुवातीला शिक्षक व संस्थाचालकांपाठोपाठ यंदाच्या वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात आहे. तर पुढील वर्षापासून आदर्श शाळांना पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा स्वागताध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या वेळी काही पुरस्कारविजेत्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केला. तसेच या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाली असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे विनोद शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. ०००००