ठाणे : बेलापूर येथील कोकण भवनात असलेले ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आता खारेगाव कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे स्थलांतरीत झाले आहे. अर्जदार यांनी त्यांच्या जात दाव्याबाबत उपरोक्त पत्त्यावर संपर्क करावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य प्राची वाजे व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अतंर्गत असलेले ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय नवी मुंबईतील कोकण भवन येथे होते. आता हे कार्यालय, खारेगाव-कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, दत्तवाडी बस स्टॉप जवळ, खारेगांव कळवा, ठाणे, पिन कोड ४००६०५ येथे नवीन जागेत स्थालांतरित झाले आहे. जात दाव्यासंदर्भात अर्जदारांनी कार्यालयाच्या नवीन पत्त्यावर संपर्क साधावा, तसेच नविन अर्जदारांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचे प्रस्ताव विहित नमुन्यात ऑनलाईन तसेच मूळ प्रत विहित कालावधीत उपरोक्त नवीन पत्त्यावरील कार्यालयात समक्ष जमा करावे, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य वाजे यांनी केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *