सलमान पठाण
मुंबई : 2 जानेवरी रोजी माहीम येथे करम फाउंडेशन कडून गरीब आणि विधवा महिलांना मुफ्त राशन, गरीब मुलांना शाळेसाठी फीस, आजरी रुग्णांना औषधे व त्या साठी आर्थिक मदत , गरीब मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य व विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
करम फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील अधिकृत संस्था असून यांच्यामार्फत माहीम विभागातील व तसेच मुंबई उपनगरातील गरीब आणि विधवा महिलांना गेल्या चार वर्षापासून विविध स्तरावर मदत करत आहे त्यांच्याकडून गरीब मुलींचे लग्नासाठी लागणारे साहित्य आजारी रुग्णांसाठी दवाखान्यामध्ये लागणारा खर्च व त्याचबरोबर गरिबांना राशन वाटप इत्यादी प्रकारचे काम वारंवार केले जात आहे या करम फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख सय्यद यांच्यामार्फत हे काम केले जाते
आत्तापर्यंत करम फाउंडेशन यांच्यामार्फत 5 हजारच्या वर कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली आहे
त्याचबरोबर याच्याकडून 15 जोडप्यांचे लग्न लावण्यास मदत करण्यात आली आहे.
कोव्हिड महामारीच्या काळात यांनी 1 हजारच्या च्या जवळपास रुग्णांना ऑक्सीजान पुरवठा केलेला आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत 400 गरीब आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य व शालेय फी साठी मदत करण्यात आली आहे.
करम फाउंडेशन कधीही हे बघत नाही की मदत घेणारी गरीब व्यक्ती हिंदू आहे की मुस्लिम आहे जातीय भेदभाव न करता करम फाउंडेशन मदत करते आणि पुढेही भविष्यात करत राहू असे आम्हाला करम फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद फारुख यांनी सांगितले
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *