कल्याण : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 28 काळा तलाव येथे मुख्य रस्त्यावर शिवसेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. आमदार विश्वनाथ भोईर यांचे पुत्र तथा कल्याण जिल्हा युवासेना सचिव वैभव भोईर यांच्या हस्ते व शिवसेना उपशहर प्रमुख माजी नगरसेवक मोहन उगले, महिला आघाडी शहर संघटक नेत्रा उगले, विभाग प्रमुख अनंता पगार, उपविभाग प्रमुख दिगंबर ठाणगे, स्वप्नील मोरे, शाखा प्रमुख धर्मेंद्र भदोरीया, नितीन कदम, रितेश पावले यांच्या उपस्थितीत श्रीराम नगर व शक्ती चौक बेतुरकर पाडा येथे शिवसेना फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच सर्व शाखाप्रमुख, महिला आघाडी युवासेना, ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला.
0000
