रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १७ दिवसात ३९५ कलमे व ९ परिशिष्ट्ये असणारी जगातील सर्वांत मोठे संविधान लिहिले आणि २६ जानेवारी १९५० पासून या देशात संविधान अंमलात येवू लागले परंतू १९५० पासुन आज पर्यंत ७४ वर्षाच्या कालावधीत भारतीय सविधानाची अंमलबजावणी या सत्तेधारी राज्यकर्त्यांनी योग्यपणे केलेली नाही. म्हणूनच बहुजन समाजाची खरी प्रगती आज ही खुंटली आहे आणि हे सत्य कुणीही नाकारु शकत नाही.
सत्तेत राहुन सविधानाची अंमलबजावणी करावयाची असते मात्र या सत्तेधारी राज्यकत्यांनी सत्तेत राहुन संविधानाची अंमलबजावणी केलेली नाही. मात्र राज्यकत्यांनी जरी संविधानाची अंमलबजावणी योग्य केली नसली तरी संविधानातूनच निर्माण झालेल्या के.मा.अ.अ. २००५ या कायद्याचा वापर करून बहुजन समाज संविधानाची अंमलबजावणी करु शकतो कारण हा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या निर्मिती मधूनच अस्तित्वात आल्याने या माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी करून संविधानाची योग्य अंमलबजावणी होईल याच माहितीच्या अधिकाराचा वापर करून याच सत्तेधारी राज्यकर्त्यांनी केलेली कामे याची माहिती मागवून सहनिशी करता येईल की, ज्या-ज्या वेळी सत्तेघारी सत्तेत आले त्यांनी किती व कोण कोणती कामे केली? भारतीय संविधानात कोण कोणत्या दुरुस्त्या केल्या? किती निधीचे वाटप झाले? असे अनेक प्रश्न या कायद्यानुसार मागविता येईल. जे प्रश्न बंधु आणि भगिनिंनो आजही तुमच्या मनात उभे आहेत.माहितीच्या अधिकाराचा वापर करुन भारतीय संविधानाची अंमलबजावणी करावयाची असेल तर त्यासाठी माहितीच्या अधिकाराचा प्रथम नमूना अर्ज, प्रथम व द्वितीय अपिलाचा नमुना अर्जाचा वापर करावा. ज्याचा वापर माहिती मिळविण्यास महत्वाचा ठरेल? मग उठा आणि उचला पेन आणि अर्ज भरुन मागवा गावची माहिती. माहिती हवी असेल तर ग्रामसेवक हा माहिती अधिकारी असतो. पं. समितीच्या माहिती करीता गटविकास अधिकारीकडे अर्ज करता येतो. ज्या-ज्या ठिकाणाची माहिती हवी आहे त्या- त्या ठिकाणाची शासकीय कार्यालयात माहिती अधिकाऱ्याची नेमणूक झालेली असते. त्यामुळे सदर जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज देवून माहिती मागवा आणि स्वतंत्र भारतात माहितीच्या अधिकाराचा वापर करा.
0000
