गोरगरीब गरजूंना केले जेवण व ब्लँकेट वाटप
कल्याण : ह्युमॅनिटी स्टील लाईव्ह च्या मार्फत तेजस सांगळे व त्यांचे सहकारी मुकुल सोनटक्के, आदित्य लासुरे, सुधीर शेट्टी, शुभम शुक्ला, श्रीराम अय्यर व अन्य सहकारी यांच्या मार्फत थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या झुगारत गोरगरीब गरजूंना मोफत जेवण व ब्लँकेट वाटप करण्यात आले.
हा उपक्रम गेले पंधरा वर्षे झाले करण्यात येत आहे. सरत्या वर्षाला 2024 ला गुड बाय करत 2025 मध्ये वेलकम करत कोणत्यातरी गोरगरिबांचे एक दिवसाचा पोट भरून व त्यांच्या अंगावर वस्त्र देण्यात आले. आपल्याला देवाने अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी दिल्या आहेत. तरीही आपण आपल्यापासून वंचित असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी पुरवाव्यात आणि पुढच्या वर्षी या उपक्रमाला कल्याणातल्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया तेजस सांगळे यांनी दिली.
०००००