कल्याण : कल्याण डोंबिवली येथील रनर्स क्लॅन फाऊंडेशनने गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली या अर्बन अल्ट्रा दौडचे सलग चार वर्ष यशस्वी आयोजन करून मोठ्या उत्साहात पाचव्या पर्वाची मोर्चेबांधणी केली आहे. हि दौड २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार असुन ६५ किमीची अर्बन अल्ट्रा, ३५ किमीची काॅन्फीडन्स आणी १५ किमीची इन्स्पायरींग दौड अशा तीन प्रकारात खेळवली जाणार आहे. या दौडला उत्कृष्ट प्रतिसाद पहाता लवकरच या दौडची नोंदणी बंद करण्यात येणार आहे. तरी लवकरात लवकर इच्छुक धावपटुंनी आपली नोंदणी रनर्स क्लॅनच्या संकेत स्थळावर किंवा ७०६६५५७०१३, ९८२१४६९९७० या संपर्क क्रमांकावर करावी असे आवाहन आयोजकांकडुन करण्यात आले आहे.