सोयगाव : विविध स्पर्धा परीक्षा साठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयी साठी शुक्रवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ग्रामपंचायत सदस्य वंदनाताई पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले
क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने जरंडी ग्रामपंचायतीने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात उपयोग घेता येणार असून सातशे विविध स्पर्धा परीक्षेचे पुस्तके, संगणक,आदी सुविधा या वातानुकूलित अभ्यासिकेत पुरविण्यात आल्या आहे तसेच या निमित्ताने संगीत विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून यावेळी बचत गटाच्या अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य वंदनाताई पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ विशाखा डुकरे, आरोग्य सेविका संगीता वानखेडे,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवने,ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील,मधुकर सोनवणे,महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एन पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
0000
