विरार : रेल्वे प्रवास हा वर्षागणिक धोकादायक ठरू लागला आहे. वर्षभरात वैतरणा ते मिरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान, रेल्वे प्रवासात 225 जणांचा बळी गेला असून 212 जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचे अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वे अपघातातील बळींच्या संकेत वाढ झाली आहे. सन 2023 साली अपघातात 204 यांचा बळी गेला असून 167 गंभीरित्या जखमी झाले आहेत.
वसई पश्चिम रेल्वे लोहमार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. पश्चिम रेल्वे लोहमार्गावरून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. वाढलेली प्रवासी संख्या आणि बर्‍याचदा प्रवासात हलगर्जीपणा केल्याने प्रवाशांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागले आहे. प्रवासात मृत्युमुखी पडणार्‍या प्रवाशांची ओळख पटवणे हे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरते. बर्‍याचदा जीव धोक्यात घालून प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असतात. तर कधी गाडीच्या दरवाज्यात लटकत प्रवास करत असतात. त्यामुळे बरेचसे मृत्यू झाले आहेत. ठिकठिकाणी प्रवाशांना या फलाटावरून त्या फलाटावर जाण्यासाठी स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. मात्र प्रवासी त्याचा वापर न करता रेल्वे रूल ओलांडून या फलाटावरून त्या फलाटावर जातात. रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक असल्याने प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलातर्फे कारवाई करण्यात येते. नागरिकांनी दिलेल्या सूचना समजून घेऊन सहकार्य केले पाहिजे. लोकलचे दरवाजे बंद झाले तर अपघाताच्या घटनांना आळा घातला जाऊ शकतो. मात्र प्रवासी त्याचा विचार करत नसल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.
वैतरणा ते मिरा रोड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान, वाढत असलेल्या अपघातातील मृत्यू तांडव थांबत नसल्याने रेल्वे प्रशासनाला अधिक परिणामकारक उपायोजना भविष्यात दृष्टीने करावे लागतील. वैतरणा ते मिरा रोड दरम्यान, विरार, नालासोपारा, वसई व मिरा रोड इस्तान के जास्त गर्दीची आहेत. यादरम्यान, अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचे दिसून येते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *