मुंबई : गतविजेत्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने अणुशक्तीनगर संघाचा १८ धावांनी पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती ढाल टी-२०क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम फेरीत स्थान मिळवले. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुपवर आठ विकेट्सनी विजय मिळवत स्पोर्ट्स फिल्ड संघाने प्रथमच निर्णायक फेरीत प्रवेश केला. युनायटेड स्पोर्ट्स क्लबने ६ बाद १८५ धावांचे आव्हान दिल्यावर प्रतिस्पर्ध्यांना ६ बाद १६७ रोखत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले. स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुपने १८.१ षटकात १३३ धावसंख्या उभारल्यावर स्पोर्ट्स फिल्ड क्लबने १७.४ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावांसह विजय निश्चित केला. विजयी संघांच्या सागर शहा ( युनायटेड)आणि अनुराग दिवेकर ( स्पोर्ट्स फिल्ड) यांची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक : उपांत्य फेरी : युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन : २० षटकात ६ बाद १८५ ( अजय जयस्वाल ९१, सागर ४६, दर्शन अडारकर ३४ धावांत २ विकेट्स) विजयी विरुद्ध अणुशक्तीनगर स्पोर्ट्स अँड रेक्रीएशन क्लब : २० षटकात ६ बाद १६७ ( गणेश पाटील ५२, सागर शहा १५ धावांत ३ विकेट्स, प्रसाद रहाटे २४ धावांत २ विकेट्स). सामनावीर – सागर शहा.
स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप : १८.१ षटकात १३३(दीपेश गुलाम ३८, ईशान मिठबावकर ३३, अनुराग दिवेकर १८ धावांत ३ विकेट्स, शशांक कामत २२ धावांत २ विकेट्स) पराभूत विरुद्ध स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब : १७.४ षटकात २ बाद १३४ ( श्रीराम पाल नाबाद ६१, अनुराग दिवेकर नाबाद ४७). सामनावीर – अनुराग दिवेकर.
