कल्याण : कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व महिला वकिलांच्या नेतृत्वाखालीकल्याण पूर्वेतील तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. नाबालीक मुलीवर झालेल्या अत्याचार व खुनाचा गुन्हा प्रकरणात आरोपीच्या विरुध्द लवकरात लवकर केस चालवुन आणि कायद्याच्या तरतुदीअनुसार जास्तीत जास्त शिक्षा फाशिची शिक्षा करण्याची मागणी या वकिलांनी केली.
कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निघृण हत्या करण्यात आली. त्या संदर्भात वकील म्हणुन निषेध व्यक्त करण्यात आला. गुन्हयामध्ये सर्व आरोपींच्या विरुध्द लवकरात लवकर फास्टट्रॅकवर दररोज केस चालवुन सर्व आरोपींना कायद्यातील तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालीका क्षेत्रात गुन्हेगारी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मागील दोन तीन महिन्यात खुनाचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचप्रमाणे कायद्याची भीती राहिलेली नसल्यामुळे महिला बालीकांवरील अत्याचार आणि हत्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी, अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे. गस्ती पथकांची संख्या वाढवुन गुन्हेगारी नियंत्रणात आली पाहिजे अशी मागणी या वकिलांच्या वतीने करण्यात आली. यावेळी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जगताप, नवीन सिंग, विजय जाधव, माया कदम, सुवर्णा सागर, राजश्री आव्हाड, निलम पाटील, हरीष सरोदे आदींसह इतर अनेक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
