राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील शेकडो विट भट्ट्या व दगडखाणी सुरू होऊन चार महिने उलटले तरी त्यांना तहसीलदार कार्यालयाकडून अधिकृतपणे राॅयल्टी मिळाली नसल्याने गौण खनिज माफियाना अधिकाऱ्यांचे पडद्या मागुन अभय मिळत असल्याने महसुल विभागाची तिजोरी रिकामी असल्याची तक्रार समाज सेविका योगिता शिर्के यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व तहसीलदार अभिजित देशमुख यांचे कडे केल्याने महसुली विभागाचे अधिकाऱ्यामध्ये खळबळ माजली आहे.
मुरबाड तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागात मुलभूत सुविधा वाढत असल्याने सर्वत्र निवासी वसाहती तसेच,तसेच व्यवसायीक इमारतीची बांधकामे सुरू आहेत.त्यासाठी लागणारे डबर खडी पुरवठा करणारे गौण खनिज माफिया हे जंगल परिसरात व पाडाळे, बारवी,शाई काळु धरणालगत नदी पात्रात दगड खाणीतुन अवैधरित्या उत्खनन करतात तर २०७ गावचे क्षेत्रामध्ये सालाबादप्रमाणे आक्टोबर महिन्यात विट भट्ट्या सुरू होतात. प्रत्येक विट भट्टी मालकाकडे शेकडो कामगार असुन त्यांचे कडून ते महिन्याला दोन तीन लाख विटांचे उत्पादन करतात.मात्र यांमध्ये एकाही दगडखाण मालकाने.विटभट्टी मालकांनी तहसीलदार कार्यालयाकडून राॅयल्टी घेतली नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असुन तो कोणाच्या खिशात जात आहे.याची चौकशी करण्यासाठी योगीता शिर्के यांनी जिल्हाधिकारी ठाणे व तहसीलदार मुरबाड यांना लेखी निवेदन दिले असुन महसुल विभागाचे अधिकाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
कोट
पाडाळे धरणावर असलेले गौण खनिज पाटबंधारे विभागाचे मालकीचे आहे.त्यांनी राॅयल्टी काढलेली असुन त्याची वाहतूक सुरू आहे.तसेच १२३ विट भट्टी मालकांनी राॅयल्टी साठी प्रस्ताव सादर केले आहेत.त्यांना दोन दिवसांत राॅयल्टी दिली जाईल -अभिजीत देशमुख.तहसिलदार मुरबाड.
