कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आज पासून आमरण उपोषण पुकारण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाला त्यांच्या मागण्याबाबत बोलवून घेऊन सविस्तर चर्चा केली व अधिकृत परवानाधारक गटई कामगार यांना काढण्यात आलेली बेकायदेशीर नोटीस त्वरित मागे घेण्यात यावी व कुठल्याही गटई कामगारावरती तोडक कारवाई करू नये असे सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांना आदेशित करण्यात आले.
महापालिकेने केलेल्या अन्यायकारक कारवाईमुळे बाधित गटई कामगारांचे आठ दिवसांमध्ये पुनर्वसन करावे असे आदेश मालमत्त विभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांना देण्यात आले व यापुढे अशी चूक होणार नाही अशी सर्वांनी खबरदारी घेण्यात यावी अशा सर्व अधिकाऱ्यांना सुचीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राम बनसोडे, माजी नगरसेवक भिमराव डोळस, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ वाघमारे, कल्याण डोंबिवली जिल्हा महिला अध्यक्ष मंगला गायकवाड, ठाणे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र राऊत, जिल्हा सचिव हनुमंत गायकवाड, कल्याण गायकवाड व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते. चर्मकार समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने राम बनसोडे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानून आपले उपोषण मागे घेतले.
