पनवेल : राज भंडारी
मराठी पत्रकार दिना निमित्त पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्रच्या रायगड नवी मुंबई शाखेच्या वतीने पनवेलमधील जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करून पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 193 वर्षांपूर्वी 6 जानेवारी रोजी दर्पण नावाने मराठी वृत्तपत्र सुरु केले होते. त्यानंतर 6 जानेवारी हा मराठी वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे आशीर्वाद म्हणजेच पत्रकारिता क्षेत्रातील जेष्ठ मंडळींचे आशीर्वाद मिळावे ही भावना बाळगून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्रच्या रायगड नवी मुंबई शाखेच्या वतीने सदर कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी दैनिक रायगड नगरीचे संस्थापक संपादक सुनील पोतदार, दैनिक किल्ले रायगडचे संस्थापक संपादक प्रदीप वालेकर, प्रमोद वालेकर, रायगड शिव सम्राटचे संस्थापक संपादक रत्नाकर पाटील आदि जेष्ठ पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सदर कार्यक्रमाला पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण बाथम, नवी मुंबई – रायगड जिल्हाध्यक्ष राज भंडारी, भूषण साळुंखे, चंद्रकांत शिर्के, दैनिक रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, पत्रकार अरविंद पोतदार, दीपक कांबळे, सुनील वारगडा, शिवसेना उबाठा गटाचे जेष्ठ नेते भरत पाटील, समाजसेवक रविंद्र पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *