राष्ट्रीय वन अहवाल २०२३ च्या माहितीनुसार वनक्षेत्राच्या बाबतीत देशासह राज्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक स्थितीत येवून ठेपली आहे.कारण देशात फक्त २१ टक्के व राज्यात फक्त १६ टक्के वनक्षेत्र शिल्लक असल्याचा खुलासा राष्ट्रीय वन अहवालात केला आहे ही अत्यंत गंभीर व धोकादायक स्थितीत नेणारी बाब आहे.आज निसर्गावर सर्वंच काही अवलंबून आहे.आज निसर्ग आहे म्हणून सृष्टी आहे. निसर्गाची संपूर्ण जळमुळ वनक्षेत्रावर अवलंबून असते.वनक्षेत्र म्हणजेच वृक्ष,परंतु आज वनक्षेत्रावर संपूर्ण मानवजातीने स्वतःच्या स्वार्थासाठी कुऱ्हाड चालवून घनाघाती प्रहार केला आहे.आज देशाचा विचार केला तर फक्त २१ टक्के वनक्षेत्र म्हणजे मानवजातीसह संपूर्ण जीवसृष्टीसाठी धोक्याची घंटा आहे.घटत्या वनक्षेत्रामुळे हवामानात बदल होवून ग्लेशियर वितळणे,भुकंप, ज्वालामुखीचा उद्रेक,भुस्खनन, अती उष्णता, अती पाऊस, सुनामी, समुद्राची पातळी वाढणे अशा भयावह घटना दिवसेंदिवस वाढतच आहे.आजच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रत्येक देशाचे वनक्षेत्र कमीत कमी ३३ टक्के असने गरजेचे आहे.परंतु आज भारतात फक्त २१ टक्के वनक्षेत्र शिल्लक असल्याचे सांगितले जाते व महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त १६ टक्के वनक्षेत्र शिल्लक आहे.म्हणजेच राज्यासह देशातील वनक्षेत्र भरपूर पिछाडीवर आहोत.महाराष्ट्रात फक्त १६ टक्के वनक्षेत्र म्हणजे मोठी धोक्याची घंटा आहे.देहरादून येथील “फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया” या संस्थेने नुकताच २०२३ चा राष्ट्रीय वन अहवाल (आयएसएफआर) दिल्ली येथील वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे सादर केला.हा अहवाल देशातील वनसंपत्ती आणि संसाधनावरील प्राथमिक माहितीच्या आधारावरचा मूल्यांकन अहवाल मानला जातो.वनक्षेत्राच्या बाबतीत देशातील राज्यात समतोल नसल्याने वनक्षेत्र घटतांना दिसते. आज आपण पहाले तर देशातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ,ओरिसा, तेलंगणा,या राज्यातील वनक्षेत्र गेल्या दोन वर्षांत वाढले आहेत.तर घनदाट जंगलाच्या बाबतीत ज्या राज्यांची गनणा होते अशा मिझोराम, नागालँड, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय या राज्यातील वनक्षेत्र घटले आहे ही चिंतेची बाब आहे.इतर राज्याच्या तुलनेत जर महाराष्ट्राचा विचार केला वनक्षेत्राच्या बाबतीत अत्यंत निचकांक असुन गंभीर परिस्थितीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे वनक्षेत्राच्या बाबतीत सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.कारण वनक्षेत्रावर संपूर्ण मानवजाती, पशुपक्षी व जीवजंतू यांची दिनचर्या अवलंबुन असते.त्यामुळे वनक्षेत्र सुरक्षित तर संपूर्ण जीवसृष्टी सुरक्षिर हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारा पाहिजे.आज संपूर्ण देशाचा विचार केला तर वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी १२ टक्के वनक्षेत्र वाढविण्याकरिता संपूर्ण ताकदीनिशी सरकारने व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे.त्याचप्रमाणे आज राज्यात ३३ टक्क्यांपर्यंत वनक्षेत्र आणण्यासाठी १७ टक्के वनक्षेत्र वाढविण्याची मोठी जबाबदारी सरकारची स्विकारली पाहिजे.वनक्षेत्र वाढले नाही तर दिवसेंदिवस बदलत्या हवामानात आणखी भर पडुन भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते याला नाकारता येत नाही. त्यामुळे वृक्ष लागवड काळाची गरज आहे. आज घटत्या वनक्षेत्रामुळे जंगली पशुपक्षी याचे हाल बेहाल होत आहे व त्यांचे जगने अत्यंत कठीण झाले आहे.आपण रोज मिडियाच्या माध्यमातून पहात असतो की,गावात, शहरात, कोणाच्या घरात,रोडवर हिंसक प्राणी(वाघ, बिबट्या,अस्वल इत्यादी) मोठ्या प्रमाणात वावरतांना दिसतात.याला संपूर्ण मानवजाती जबाबदार आहेत.देशात हत्ती कर्नाटक व ओरिसा राज्यात सर्वाधिक आहे म्हणजेच जगभरात असणाऱ्या हत्ती पैकी ६० टक्क्यांहून अधिक हत्ती भारतात आहे. परंतु जंगल कटाईमुळे व वनक्षेत्राच्या घटत्या परिणामामुळे हत्तीचे कळप आपल्याला इतरत्र राज्यात येतांना दिसतात.यामुळे या महाकाय प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.जंगल कटाईमुळे वन्यप्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.ओडिशात गेल्या ११ वर्षांत ८५७ हत्तींचा मृत्यू अपघात, आजार, शिकार , विजेता झटका यामुळे त्यांचा मृत्यू झाला.अशाप्रकारे वन्यप्राण्यांवर मानवी अत्याचार वनक्षेत्र घटल्याने होत असल्याचे दिसून येते.घटत्या वनक्षेत्रामुळे हवामानात बदल होवून देशातील प्रदुषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
अमेरिकेच्या हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटने “स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२४ ” हा अहवाल सादर केला आहे.त्यात दावा करण्यात आला आहे की भारतातील वायुप्रदूषण अतिशय चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. वायुप्रदुषणामुळे जगभरातील मृत्यूच्या तुलनेत २५ टक्के मृत्यू भारतात होतात म्हणजेच भारत वायुप्रदूषणच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे दिसून येते आणि ही गंभीर बाब आहे याला रोखण्यासाठी वनक्षेत्र वाढविण्याची नितांत गरज आहे व संपूर्ण स्तरातुन वृक्षलागवड मोहीम युद्धपातळीवर राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.