नवी मुंबई : मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे व वाशी विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1) वसीम अकबर अली खान, रूम नं. 23, सेक्टर-15, कोपरखैरणे, नवी मुंबई, व 2) अंकुश नाना जगताप/ योगेश नाना जगताप, एस.एस. टाईप, रूम नं. 678, सेक्टर-15, कोपरखैरणे, नवी मुंबई. यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली. त्यापैकी वसीम अकबर अली खान यांचेकडून अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी दंडात्मक शुल्क रू.10,000/- पावती क्र.248395, दि.06/01/2025 अन्वये वसूल करण्यात आलेले आहे.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी 7 मजूर, इलेक्ट्रॉनिक हॅमर – 02, गॅस कटर – 01, पिकअप व्हॅन – 01 वापर करण्यात आले.
ठाणे बेलापूर रोड कोपरखैरणे ब्रीज खालील 19 बेघर लोकांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आले. तसेच सेक्टर-19,20 व कोपरखैरणे गाव येथील शाळा परिसराच्या 100 मीटरच्या आत तंबाखू/पानविक्री/गुटखा विक्री करणा-या 03 टप-यांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आलेले आहे. या माहिमेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोपरखैरणे, औदूंबर पाटील, त्यांचे विभागाकडील पोलिस उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी अंतर्गत अफताब जाकारीया जानवेकर व परवेज जाकारीया जानवेकर, युनिट क्र. एस.एस/3-227, सेक्टर- 02, वाशी, नवी मुंबई यांचे इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53 1(अ) अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले असल्यामुळे दि. 12/12/2024 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांनकडून रु.25,000/- दंड ही वसुल करण्यात आलेला आहे. तदनंतर संबंधितांनी पुन्हा काम सुरु ठेवल्यामुळे दि. 06/01/2025 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत पुन्ह:श्च तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांनकडून रु.10,000/- दंड ही वसुल करण्यात आलेला आहे. या धडक मोहिमेसाठी सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर मोरे तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण 10 मजुर, 1 इलेक्ट्रिकल हॅमर, 1 गॅस कटर व पोकलन यांचा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
