बाबासाहेब जंजाळ यांचे मत
सोयगाव : वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्यासाठी वर्तमानपत्रे महत्त्वाची भूमिका पार पाडतात, समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल व्यक्तीला सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रे ही एक फार मोठी शक्ती आहे तिचा उपयोग समाज बदलण्यासाठी होऊ शकतो असे ठामपणे बाबासाहेब जंजाळ पाटील पत्रकार दिनी म्हणाले.
सोयगाव तालुक्यातील वडगाव – घोरकुंड ग्राम पंचायत दालनात सोमवारी पत्रकार दिनानिमित्त सन्मान पत्रकाराचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला प्रमुख ग्रा. पं. अधिकारी कल्पना कचरे, सरपंच नंदाताई संतोष पवार, जनार्दन पंडीत आघाडे सदस्य , बाळासाहेब जंजाळ पाटील,भागवत पाटील, गणेश देविदास गुंजाळ संगणक परिचालक, समाधान वसंत मासरे , संदिप प्रकाश साबळे ,भागवत पाटील विश्राम पाटील, विकास बाबू अमेश आदीच्या उपस्थितीत विजय पगारे मराठवाडा विभागिय अध्यक्ष,पत्रकार जनसेवा संघ संचलीत,महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघ यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन येथोचित्त सत्कार करण्यात आला,पुढे संबोधित करतांना जंजाळ पाटील म्हणाले की, बाळ शास्त्री जांभेकर त्यांचा यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यासाठीच जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना आपणास काही क्षणात समजतात त्यात नवीन शोध,राजकारण, अर्थकारण सभा संमेलने,कला, क्रीडा,शिक्षण, निवडणुका,चित्रपट प्रदर्शित होणे, खून फसवणूक,दरोडे, किंवा समाजातील स्थित्यंतरे याबाबतची माहिती असो,आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम पत्रकार बंधु करतात,समाजासाठी सातत्यपूर्ण झगडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो, पत्रकार हे देशाचे खरे भक्त असतात याची जाणीव समाजाला करून देण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.