उत्तम जानकरांचा खळबळजनक आरोप ० ताज, ओबेरॉयचे सीसीटिव्ही फुटेज तपासा, महाराष्ट्र हादरून जाईल

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री हे पुरूष वेश्या असल्याचा खळबळजनक आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. उत्तम जानकर हे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार आहेत. ताज, ओबेरॉयचे सीसीटिव्ही फुटेज तपासा, महाराष्ट्र हादरून जाईल असा दावाही उत्तम जानकर यांनी केला आहे.

एक महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलीया घटनेनं राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराडचा आका हे धनंजय मुंडेच असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. आणि त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी नुकतेच राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सुरेश धस यांनी अनेक हिंदी आणि मराठी अभिनेत्रींशीही त्यांचा संबध जोडला होता. त्यात आता उत्तम जानकरांनी हा बाँम्बगोळा टाकल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होताआता अजित पवार यांच्याकडून हीच अपेक्षा  होती अजून काय अपेक्षा करणारअसं जानकर यांनी म्हटलं आहे. जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेअशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.  “धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होताअसं त्यांनी म्हटलं होतं. आपल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जानकर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. तुमच्या पक्षाचे नेते आहेतमग तुम्ही ताजओबरॉय हॉटेलचे CCTV फुटेज का काढत नाहीत?  CCTV फूटेज काढा महाराष्ट्र हादरून जाईलअसं जानकर यांनी म्हटलं आहे.

बीड प्रकरणात जिह्यात अराजकता निर्माण झाली आहेराजकीय वरदहस्त लाभल्याशीवाय गुंड तयार होत नाहीतराजकीय नेते गुंडांना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पोसतात असंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *