अशोक गायकवाड
रत्नागिरी : लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले अर्ज तसेच अद्याप प्रलंबित असणारे अर्ज संबंधित विभागाने तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयगायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण बिरादार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह यांनी अर्जनिहाय सविस्तर आढावा घेतला. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरण करण्याच्या सूचना केल्या.
