नंददीप को- ऑप. हौसिंग सोसायटीच्या
राजेंद्र साळसकर
मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने नंददीप को-ऑप हौसिंग सोसायटीच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी, १० जानेवारीला भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. प्लॉट नं -३७१, श्रद्धानंद रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख उद्घाटक आमदार प्रविण दरेकर यांसह विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग अळवणी, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष भारती सोमपुरा, सचिव घनश्याम सोमपुरा, खजिनदार अजय सोमपुरा यांनी दिली आहे. तसेच या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
0000
क्षत्रिय मराठा सोसायटीच्या घाटकोपर शाखेचे प्रविण दरेकरांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन
महेंद्र सातपुते
मुंबई- मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या घाटकोपर (पूर्व) येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवार, ९ जानेवारी २०२५ रोजी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. जय जिनेंद्र को-ऑप. हौसिंग सोसायटी, शॉप नं -०६, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून घाटकोपर विधानसभेचे पराग शहा, माजी मंत्री प्रकाश मेहता, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, शरदचंद्र पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती निमंत्रक व मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राजेश येरुणकर, उपाध्यक्ष अंकुश मोरे, समाजसेवक सुभाष पवार व मुंबई हौसिंग फेडरेशनचे संचालक अजय बागल यांनी दिली.
0000