मुंबई : कुर्ला येथील पंचशील बुद्ध विहारात डॉ. आंबेडकर चौक विकास संघ आयोजित उठाव साहित्य मंचच्या वतीने नुकतेच कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उठाव साहित्य संघाचे अध्यक्ष कुणाल वाघमारे यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची पूजा करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाहीर संभाजी मोरे, विवेक मोरे, बबनदादा सरवदे आदींची उपस्थिती होती.
कविसंमेलनात गजानन गावंडे , चंद्रकांत शिंदे, नामदेव सावळे, रविकिरण म्हस्के, राजेंद्र बनसोडे, अतुल शेलार, वसंत हिरे, सुधाकर सरवदे, विशाल वाघमारे, जगदेव भटू, राजरत्न राजगुरू, कुणाल कांबळे, शाम बैसाने, विजय ढोकळे, अरुण सर्वागौड, सिद्धार्थ रणपिसे आदींनी आपल्या प्रबोधनपर कविता सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन संदेश कर्डक यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन दोडके, प्रशांत कांबळे, विकास यादव, सुलभा कांबळे, विजया कदम, सुनील धनवजिर, गणेश वाघमारे, ओम गायकवाड, शिधांत कांबळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास बौद्ध उपासक, उपसिका उपस्थित होत्या असे रघुनाथ वाघमारे यांनी सांगितले.
०००००