30 जणांच्या तपासणीत 8 वाहनचालकांना मोतीबिंदू
ठाणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय व फोर्टिस हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ढचढ बस चालकांकरीता घोडबंदर रोड आनंद नगर बस डेपो येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्या मार्ग दर्शनाने दिनांक 08/01/025 रोजी नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. तपासणी दरम्यान 101 ढचढ बस चालकांचे नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 30 पेक्षा अधिक वाहन चालकांना दृष्टी दोष असल्याचे आढळून आले. तसेच 8 वाहन चालकांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले.
सदर शिबिरास उपस्थित परिवहन अधिकारी विजय दरगोडे (मोटर वाहन निरीक्षक) अविनाश सूर्यवंशी (मोटर वाहन निरीक्षक) मिथीलेश नालमवार (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक) श्री.ज्ञानेश्वर बोरसे (चालक) यांनी रस्त्यावरील वाहनांचे होणारे अपघात टाळणे मोबाईल फोनचा वापर न करणे, ड्युटीवर असताना फावल्या वेळात कोणतीही नशापाणी न करणे वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे अशा अनेक आढळलेल्या त्रुटींचे आवश्यक पालन करणे नागरिक प्रवासी यांचा सुरक्षित प्रवासा हेतूने रस्ता सुरक्षे बद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले तसेच आनंद नगर ढचढ डेपो व्यवस्थापक दिपक साहू यांनी बस चालक यांनी परिवहन अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला फोर्टिस हॉस्पिटल तर्फे डॉ.शीतल ढाये व आनंद नगर बस डेपो चे मॅनेजर श्री.दीपक साहू व श्री. प्रभाकर उपस्थित होते.श्री.ज्ञानेश्वर आव्हाड ीीं चालक उपस्थित होते.
०००००