विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व मैदानी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी उपक्रम

कल्याण : रोटरी क्लब ऑफ कल्याण तर्फे नुतन विद्यालय कल्याण पश्चिम येथे एक अभिनव उप्रकम राबविण्यात आला. हा उपक्रम वय वर्ष ७ ते १५ वयोगतातील विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व मैदानी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी “आठवणीतले खेळ” चला मोबाईल विसरुया मैदानी खेळ खेळूया हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी गोट्या, विट्टी दांडु, भवरा, लगोरी, आबा दुबी, माझ्या मामाच पत्रे हरवलं, रुमाल पळविणे, आंधळी कोशिंबीर, गाडा चालवणे, कुलूप किल्ली असे विविध खेळ रोटरी क्लब कल्याण तर्फे पुरविण्यात आले. मुलांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला पालकांनी व शिक्षकांनी त्यांना यथायोग्य खेळाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी क्लब प्रेसिडेंट पराग कापसे, सचिव आत्माराम घाणेकर, अरुण सपकाळे, विनोद सिंग, माजी प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, दिलीप कर्डेकर, जयश्री कर्डेकर, सी बी कुलकर्णी, रोहन गोळे, रेश्मा सय्यद, हनीफ सय्यद यांनी परिश्रम घेतले. पालकांनी रोटरी क्लबला असे कार्यक्रम पुन्हा घेण्याची विनंती केली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *