मंजुरी 125 फुट तरतुद दहा लाख.उभारला चाळीस फुट
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहा समोर 125 फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी शासनाने दहा लाखांची तरतूद केली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त चाळीस फुट ध्वजस्तंभ उभारला आणि दहा लाख रुपये खर्च केल्याचा फलक लावल्याने देशप्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली असुन ते येत्या प्रजासत्ताकदिनी शेकडोंच्या संख्येने तहसीलदार कार्यालया समोर आंदोलन करुन ध्वजस्तंभाचा तहसीलदारांनी पंचनामा करुन कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याने तहसीलदार अभिजित देशमुख काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड यांचे अधिपत्याखाली असलेल्या शिवनेरी या शासकीय विश्रामगृहा समोर उप अभियंता कैलास पंतिगराव यांनी 125 फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा घाट घातला आणि त्यांनी प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता मिळण्या अगोदर फक्त चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारला,या ध्वजस्तंभाला फेब्रुवारी 2023 प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता असताना पंतीगराव यांनी जानेवारी 2023 मध्येच फक्त चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारला आणि दहा लाख रुपये खर्च झाला असल्याचा फलक लावला.याबाबत दै.लोकमतसह अनेक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसारित केल्या असता तात्कालीन विधानसभा सदस्या यामिनी जाधव व इतर विधानसभा सदस्यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला असता.एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाणी न केल्याने उप अभियंता अभियंता कैलास पंतिगराव,यांनी असा कोणताच प्रकार घडला नाही असा अहवाल विधीमंडळास सादर करून विधीमंडळाची दिशाभूल करण्यात यशस्वी झाले.परंतु ध्वजस्तंभात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जागृत नागरिकांनी मुख्य अभियंता,कोकण प्रदेश,लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य, दक्षता व गुणनियंत्रण विभाग कोकण भवन.मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, ठाणे,कोकण भवन,मंत्रालय ,आपले सरकार पोर्टलवर तक्रारी केल्या परंतु सर्वच विभागाचे अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवुन आपली जबाबदारी झटकली असल्याने, राष्ट्रीय ध्वजस्तंभात अनियमितता करणाऱ्या आणि त्या अधिकाऱ्याला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी 26 जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालया समोर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असल्याने अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.
मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या ध्वजस्तंभा बाबत अनेक तक्रारी आल्या आहेत त्याची चौकशी करण्यासाठी एक दोन दिवसात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे -सिध्दार्थ तांबे.अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे.
! सदर प्रकरणात येणाऱ्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करुन तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दि.10 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, पोलिस निरीक्षक यांचे समवेत बैठक आयोजन केले आहे.
00000