पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहूल गांधी या खटल्याच्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरीन्सींग द्वारे न्यायालयासमोर आले. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजुर केला.

या खटल्याची पुढची सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार आहे. राहुल गांधींनी माफीवीर असे म्हणत सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपने राहुल गांधींविरुद्ध आंदोलनही केले होते. तर, भारत जोडो यात्रेतही त्यांनी सावरकरांचे नाव घेतल्याने वाद निर्माण झाला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालायात 19 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *