अशोक गायकवाड
रायगड : मे.इझिनॉक्स स्टिल्स लि.कंपनीच्या समपहरण केलेल्या मालमत्तेचा तहसील कार्यालय, खालापूर येथे सोमवार, २३ डिसेंबरला जाहीर लिलाव होणार आहे. लिलाव घेण्यास कोणीही न आल्यास किंवा योग्य बोली न लागल्यास सचिन किर्दत, तलाठी सजा सावरोली यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रु. १/- नाममात्र बोलीवर लिलाव घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.अशी माहिती खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे.
मे.इझिनॉक्स स्टिल्स लि. तर्फे डायरेक्टर सुधीर गुप्ता, रा. आनंदवाडी-सावरोली, ता. खालापूर, यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी, विनिर्दिष्टी केलेल्या मालमत्तेचे समपहरण करण्यात आले असून विक्रीसाठी यामध्ये निश्चित केलेल्या दिवसापूर्वी तलाठी सजा सावरोली यांना, देय रक्कम दिली नसेल तर, उक्त मालमत्ता, तिच्यावर बसविण्यात आलेल्या सर्व भारापासून व तिच्या संबंधात करण्यात आलेली सर्व अनुदाने व संविदा यांपासून मुक्त, अशी मालमत्ता तहसिल कार्यालय, खालापूर येथे सोमवार,दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, जाहीर लिलावाव्दारे विकण्यात येणार आहे, असे खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी कळविले आहे. गाव आनंदवाडी भू- मापन क्रमांक व पोट-विभाग सं. नंबर क्रमांक ५/१, क्षेत्र (चौमी) ४ हजार ७००, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार संबंधीत क्षेत्रासाठी हातची किंमत १ कोटी १८ लाख ६४ हजार २००, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार क्षेत्र रु.३८१० चौमी साठी हातची किंमत १ कोटी १८ लाख ६४ हजार २००, देय असलेल्या जमीन महसूलीची थकबाकी १ कोटी ०२ लाख २२ हजार ७६०.
